चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल दिनांक:-२५/१२/२०२३. दि.२७/१२/२०२३ ते दि. ३१/१२/२०२३ या कालावधित राष्ट्रीय शालेय मैदानी १९ वर्ष आतील मुले/मुली किडा स्पर्धा २०२३-२४, तालुका किडा संकुल, बल्लारपुर (विसापुर) जि. चंद्रपुर येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धेकरीता संपूर्ण देशातुन २८ राज्य व ८ केंद्रशासीत प्रदेशातुन खेळाडु मुले/मुली सहभागी होणार आहे. सदर राष्ट्रीय किडा स्पर्धाचे दि. २७/१२/२०२३ रोजी उ‌द्घाटन संभारम आयोजित करण्यात येणार असुन स्पर्धेदरम्यान खेळाडुची चंद्रपुर ते किडा संकुल विसापुर या महामार्गावरुन आगमन व निर्गमन होणार असल्याने खेळाडूंचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन वाहतुकीला अडथळा होवु नये म्हणुन या मार्गावरील जड वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे. मुंबई पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशिर अधिकारान्वये, मी रविंद्रसिह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर असे निर्देशीत करतो की, सदर राष्ट्रिय किडा स्पर्धेकरीता असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करणेबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात येत आहे.

दिनांक २७/१२/२०२३ रोजी सकाळी ०७:०० वा. ते २४:०० वा. पर्यंत बामणी फाटा बल्लारपुर ते बंगाली कॅम्प चौक चंद्रपुर पर्यंत जड वाहतुक बंद राहील.

या कालावधीत जड वाहतुक दारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१ . वरोरा, भद्रावती व चंद्रपुर कडुन राजुरा किंवा गडचांदूर जाण्यासाठी पडोली धानोरा फाटा-भोयगांव रोडचा

अवलंब करावा.

२. गडचांदुर व राजुरा कडुन वरोरा, भद्रावती व चंद्रपुर येण्यासाठी भोयगांव-धानोरा फाटा-पडोली या मार्गाचा वापर करावा.

३. गोंडपिपरी व कोठारी कडुन चंद्रपुर किंवा मुल जाण्यासाठी येनबोडी- पोंभुर्णा या मार्गाचा वापर करावा. ४. चंद्रपुर व मुल कडुन बल्लारशा, गोंडपिपरी, राजुरा जाण्याकरीता पोंभुर्णा -येनबोडी मार्गाचा अवलंब करावा.

याकरीता आम्ही हा आदेश पारीत करीत आहे. वरिल निर्देशाचे पालन करुन जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]