धुळीच्या साम्राज्यामुळे पवनी करांचे आरोग्य धोक्यात


तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी येथे गटार खोदकाम व पाईपलाईनचे काम कासव गतीने सुरू असल्याने सिमेंटचे रस्ते उखडून जागोजागी खड्डे व धुळीचे साम्राज्य आहे.त्यामुळे पवनी करांचे आरोग्य धोक्यात आले असून पवनी नगर परिषद अंतर्गत सांडपाण्याची तसेच मल वाहून नेण्याकरिता रस्त्यामध्ये खोदकाम करून भुयारी पाईपलाईनचे काम सुरू आहे या खोदकामामुळे जागोजागी खड्डे तर पडलेच आहे व पाईप फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जागोजागी खड्ड्यामध्ये पाणी साचून डासांचे प्रमाण वाढलेले आहे. धुळीमुळे श्वसनाचेही आजार वाढलेले आहे.व सोबतीला अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून एकंदरीत पवनी करांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण झाला आहे. नगरपरिषद बघ्याची भूमिका घेत आहे. ज्या कंपनीला खोदकामाचे टेंडर दिले असेल त्या कंपनीकडून व्यवस्थित रस्ते करण्याची जबाबदारी पवनी नगर परिषद ची आहे.परंतु असे कुठलेही चित्र न दिसता मुख्याधिकारी हे ठेकेदाराचे पाठराखण करीत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास जनता आंदोलन करेल अशी चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना तर्फे आंदोलन छेडल्या जाईल असे पदाधिकाऱ्यांनी सुचविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]