ध्येय निश्चित असले की यश मिळते जयदीप कटकमवारआपले ध्येय निश्चित झाले आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते असा आत्मविश्वास जयदिप कटकमवार यांनी व्यक्त केला.
प्रेस क्लब मूल च्या वतीने नवभारत कनिष्ठ महाविद्यालय, नवभारत कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत 'अनुभवाचे बोल' या कार्यक्रमात जयदिप कटकमवार बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक झाडे होते. नवभारत कन्या विद्यालय मूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष दीपक देशपांडे, कार्याध्यक्ष अमीत राऊत, उपाध्यक्ष सतिश राजूरवार मंचावर उपस्थित होते.
जयदिप कटकमवार हा मूल तालुक्यातील बोरचांदली या ग्रामिण भागातील विद्यार्थांने कठीण स​मजली जाणारी आयआयटी परिक्षा उत्तीर्ण करून, दिल्ली येथील आयआयटीत प्रवेश घेतला. जयदिपचे यश ही मूल तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून, त्यांची प्रेरणा इतर विद्यार्थाना मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जयदिप कटकमवार यांनी आपण दहावी पासूनच आयआयटी करण्यांचे ध्येय निश्चित केले होते, चांगल्या आयआयटीत प्रवेश मिळावा यासाठी आपण परिश्रम घेतले, पहिल्या प्रयत्नात मनासारखी आयआयटी मिळाली नाही, मात्र दुसर्या प्रयत्नात स्वप्न पूर्ण झाल्यांचे त्यांनी सांगीतले.
पुष्प गुच्छ व स्मृतीचिन्ह देवून प्रेस क्लबच्या वतीने जयदिप कटकमवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सिध्दावार यांनी केले. प्रेस क्लबच्या वतीने दीपक देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्नांची उत्तरे जयदीप यांनी दिली.
यावेळी प्राचार्य अशोक झाडे, मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार, योगेश कटकमवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अमीत राऊत, संतोष गव्हारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मेंद्र सुत्रपवार यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार नितेश मेकर्तीवार,मंगला बोरकुटे यांचेसह प्रा. कामडी, प्रा. पुस्तोडे, प्रा. काटकर, प्रा. उगेमुगे, प्रा. सौ. कामडी, प्रा. सौ. सुरभी वैरागडे यांचेसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]