हरांबा येथे आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उपक्रम

हरांबा येथे आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उपक्रम
सावली - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपक्रमातून हरांबा येथे आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर पार पडले. या शिबिरात शेकडो व्यक्तींनी सहभागी होऊन लाभ घेतला.
        तालुक्यातील हरांबा येथे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर सुरु आहेत. हरांबा येथे हजारो लोकांनी आरोग्याची व डोळ्यांची तपासणी केली. त्यात ७०० लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन माजी पंचायत समिती सभापती राकेश गड्डमवार यांनी केले तर अध्यक्षस्थानी सावली तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर कारडे प्रमुख उपस्थिती म्हणून हरांबाचे सरपंच देवानंद मानकर ,उपसरपंच प्रवीण संतोषवार, ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन कुनघाडकर, ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष दिलीप लटारे, दिवाकर काचीनवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडे, उपसरपंच लोंढोली प्रमोद खोबे, युवक काँग्रेस सरचिटणीस रुपेश किरमे, मुखरू गोहने,,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम तसेच ग्राम पंचायत सदस्य लोंढोली डोमाजी चौधरी, लक्ष्मीबाई भोयर, विठ्ठल मंगर, बादल गेडाम, भूषण गुरुनुले,.संतोष शेंडे,मा.विपुल बोदलकर, अमोल भोयर, अभिषेक कुनघाडकर,.देवा गेडेकर यांच्या सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]