तळोधी बा. पोलिसांची धडक कारवाई रेतींचा टिप्पर पकडला.

तळोधी बा. पोलिसांची धडक कारवाई रेतींचा टिप्पर पकडला.
(डिसेंबर महिन्यात ही दुसरी कारवाई)
यश कायरकर:
आज तळोधी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून वाढोणा ते उश्राळा मेंढा या रोड वरती रेती भरून एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीमध्ये रेतीपुरवठा करणाऱ्या टिप्पर ला पकडून त्यावर गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला.
 यावेळी वाहन चालक गंगाधर हरिभाऊ मेंढे, वय 42 वर्ष, रा. आजगाव, तह. पवणी  जि. भंडारा. याला अटक करण्यात आली. तर वाहन मालक नासिक ईश्वर सहारे, रा. दिघोरी, नागपूर यांच्या वर
अपराध क्र. 308/23 कलम 379, 34 भादवी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
  यावेळी बारा चाकी टिप्पर क्र. MH-40-BG-2479 व त्यात भरून असलेली अंदाजे 6 ब्रास रेती एकूण किंमत 30,30,000/- रु चा माल. जप्ती करण्यात आला.  हि रेती वैनगंगा नदीच्या पात्रातून चोरी करून  वाढोणा परिसरातील एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीमध्ये रेतीपुरवठा करण्यात येत होती. सदरची कारवाई ठाणेदार मंगेश भोयर यांचे मार्गदर्शन मध्ये पोलीस कर्मचारी रत्नाकर देहारे, राहुल चिमुरकर व वाहन चालक सुरेश आत्राम यांनी केली.
अवैध रित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या चार चाकी टिप्पर विरुद्धची ही चालू महिन्यात सतत चीं दुसरी कारवाई आहे. यापूर्वी एक डिसेंबरला मेंडकी तळोदी मार्गावर गस्ती दरम्यान एक मोठा ट्रक क्रमांक MH-27-1199 याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे वैनगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून त्याची अवैध वाहतूक आपल्या परिसरात सुरू असलेल्या मोठमोठ्या ठेकेदारांच्या रस्त्यांच्या कामावर बांधकामाकरिता ही रेती वापरली जाते. मात्र तळोधी पोलिसांनी केलेल्या या दोन्ही धडक कारवायांमुळे रेती चोरांचे धाबे दणाणले आहेत. मात्र स्थानिक रेती तस्करी करणाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही करण्यात येणार काय.? याकडे सुद्धा लोकांचे लक्ष लागलेलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]