तांड्यावर जन्मलेले 'ते' आता देतात गरीबांना घरकुलाचा अधिकार!

तांड्यावर जन्मलेले 'ते' आता देतात गरीबांना घरकुलाचा अधिकार! 


नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कुरूळच्या बंजारा तांड्यावर 'त्यांचा' जन्म झाला.  बालपण तांड्यावरच संवगड्यासोबत गेले.  तांड्यावरच्या कुळा—मातीच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेले घर! या घरात बालपण घालवितांना, येत असलेल्या अडचणीचे दु:ख आता त्या अधिकार्यांना स्पष्ट जाणवू लागले.  पक्के घर नसले की,  कुटूंबाचे कशी होरपळ होते हे त्यांनी जवळून बघितल्यांने तसे दु:ख कुणाच्याही वाटेला येवू नये यासाठी आता आपल्या क्लास वन अधिकारी पदाचा सदुपयोग करीत गरीबांना घरकुल कसे मिळेल? यासाठी मनापासून कार्यरत आहे. तांड्यावर जन्मलेल्या आणि आता अधिकारी म्हणून गरीबांना घरे देण्यात पुढाकार घेणार्या ते अधिकारी म्हणजे, मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी (उच्च श्रेणी) बी. एच. राठोड!
प्रेस क्लब मूलच्या वतीने मूल तालुक्यातील धोरणात्मक बदल घडविणार्याना बोलते करण्यासाठी 'मीट द प्रेस'चे आयोजन करण्यात आले.  त्यात मूल पंचायत समितीचे बीडीओ बी.एच. राठोड आपले अनुभव कथन करीत होते.


बी.एच. राठोड यांचा जन्म बंजारा तांड्यावर झाला.  बालपण या तांड्यावरच गेले.   पुढे शिक्षण वसंतराव नाईक आश्रम शाळेत झाले.  ज्या भागात ते जन्मले, त्या भागात रोजगाराची वाणवा होती, दुष्काळी भाग म्हणूनच महाराष्ट्राच्या नकाशावर या भागाची ओळख आहे. गावात राहून रोजगार मिळू शकणार नाही याची खात्री झाल्यांने मुंबई येथे स्थायी असलेल्या बहिण आणि भाऊजीकडे आपले बिर्हाड थाटले.  मुंबईत एका कंपनीत चारशे रूपये महिण्याची नौकरी केली.  मात्र मनातले स्वप्नपूर्ती करीता त्यांनी एमपीएसची परिक्षा दिली.  त्यात ते यशस्वी झाले आणि अधिकारी म्हणून मुंबई परिसरातील आदिवासी भागात सेवा दिली.
प्रत्येक विभागात करण्यासारखे काम आहे, मात्र तांड्यावर असतांना घराची परिस्थिती अनुभवली असल्यांने, गावात गेलो की, घरकुलांकडे प्राधान्याने लक्ष देतो असे एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी सांगीतले.
आपण कधीतरी क्लास वन अधिकारी होवू असे कधीही स्वप्न पाहीले नव्हते, मात्र ते पूर्ण झाले तो क्षण आपल्यासाठी अविस्मरण ठरला असल्यांची कबुली त्यांनी दिली.  2008 मध्ये आपल्याला हृदृय विकाराचा झटका आला.  दहा दिवस आपण बॉम्बे हॉस्पीटल मध्ये मृत्युशी दिलेली झुंज माझे आयुष्यातील दु:खद घटना असल्यांचेही त्यांनी सांगीतले.  आपण बहिण आणि भावजीमुळे इथपर्यंत पोहचलो यांची प्रांजळ कबुली देत, अधिकारी नसतो तर शिक्षक झालो असतो असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात माहिती दिली.
मीट द प्रेसचे प्रास्ताविक दीपक देशपांडे यांनी केले.  पत्रकारांचा परिचय अमीत राऊत यांनी करून दिला.  संचालन धमेंद्र सुत्रपवार यांनी तर आभार प्रदर्शन कुमूदीनी भोयर हिने मानले.  मीट द प्रेस कार्यक्रमात प्रेस क्लबचे सर्व सदस्य पत्रकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]