अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रक जप्त, तळोधी बा.पोलीसांची कारवाई.
तळोधी बा: 
       गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी केली जात आहे.रेतीची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर चे रस्ता मार्ग चुकीमुळे मेंडकी मार्ग तळोधी या मार्गावर रात्री च्या दरम्यान अवैध रेती वाहतूक ट्रक द्वारे सुरू होती.तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रभाकर मंगाम, पोलिस शिपाई राहुल चिमुरकर, पोलिस हवालदार सुरेश आत्राम यांनी चेंकीग गस्त करताना ट्रक क्रमांक एमएच,-27 dp 1199 अवैध वाळू 50000 व वाहन किंमत 5000000लाख रुपये किंमतीचे माल जप्त करण्यात आले.तळोधी बा.पोलीस स्टेशन मध्ये विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर सय्यद मोबीन सय्यद अल्लीउद्दिन रा.अमरावती वय 31  वर्षे , व प्रसाद चक्रधर भुगुल वय 31 वर्षे यां दोघांवर वर अपराध क्र.293अंतर्गत कलम 379,34 भांदवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास तळोधी पोलिस स्टेशन पी.एस.आय.सहदेव गोवर्धन करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]