गुरुनानक महविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा: सुवर्ण महोत्सवी वर्ष साजराबल्लारपूर:-  (धनंजय पांढरे )गुरुनानक महविद्यालयाच्या माजी  विद्यार्थ्यांच्या वतीने 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने येथील राजे बल्लाळशाह नाट्यगृह  स्नेहमिलन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता महाविद्यायात शिकलेले आणि सद्यस्थितीत वेगवेगळ्या शहरात, देश- विदेशात राहणारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यायाचे माजी विद्यार्थी तसेच डीपरचे संस्थापक हरिष बुटले हे होते आणि महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.शरद पोकळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. विलास देशमुख, प्रा. खटी ,डॉ. राजीव वेगिनवार,प्रा. घोरपडे, डॉ.पाटणकर ,डॉ. संजय निळे, डॉ. कोरडे, प्रा. घोडे, प्रा. सोईतकर, डॉ . मासटवार ,डॉ. चौकसे, डॉ. बहिरवार, डॉ. गोंड, प्रा. बोबडे, प्रा. शाह,प्रा. नागपुरे , प्रा. रावला यांचा सत्कार शाल श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देउन करण्यात आला. महाविद्यालच्या  आवराबाहेर अनेक वर्षांपासून आजतागायत चहा व नाश्ता दुकानात सेवा देणारे शांताराम कांबळे आणि फारुख अली यांचा सत्कार करून नाविन्यता ठेवली. याव्यतिरिक्त विद्यापीठात प्राविण्य गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सभागृहात विविध कार्यक्रम घेण्यात आले.  त्यात प्रणय विघ्नेश्वर यांनी रंगारंग कार्यक्रम आयोजित केला.  कार्यक्रमाचे  संचालन नरेश मुंदडा, श्वेता झा, राधा गुप्ता, वाणी रामजी यांनी केले. यानिमीत्ताने माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला वॉटर कुलर भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ. अजय पाचभाई, नरेश मुंदडा, कार्तिक वागदेव,  डॉ. विजय वाढई, डॉ. देवेंद्र लिंगोजवार, विरेंद्र आर्या, प्रमोद चुंचुवार ,अखिलेश पाटील, अजय दिकोंडावार, राजू  जोगड, अभिजित पाटणकर, विजय दिकोंडावार,  प्रा.अमोल गर्गेलवार, श्वेता झा, राधा गुप्ता , सुवर्णा कानपेल्लीवार ,प्रणय विघ्नेश्वर, उत्कर्ष मून, डॉ. प्रफुल्ल काटकर, डॉ. योगेश खेडेकर, अजय  गुप्ता यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]