कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन समारंभ संपन्न सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची नंदूरबार जिल्हा शाखेची घोषणा 
 नागभीड:  सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था,    नागभिड  च्या वतीने ५ डिसेंबर हा *कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन आणि वार्षिक स्नेहमिलन व संवाद समारंभ* उत्साहात साजरा करण्यात आला 
या प्रसंगी  कुष्ठांतेय सक्षमीकरण दिनाचे औचित्याने  कुष्ठांतेयाच्या समस्या सोडविण्यासाठी " *समस्या निवारण केंद्र"* चे उदघाटन करण्यात आले.  सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या आर्थिक मदतीने ज्या कुष्ठांतेयांनी आपले व्यवसाय सुरु करून यशस्वीपणे  नियमित  सुरूठेवून त्याची वाढ  केली अशा कुष्ठातेयाचा शिल्ड श्रीफळ व पुष्पगुच्च  देऊन यावेळी सत्कार करण्यात आले.
तसेच नंदुरबार या कुष्ठबहुल आदिवासी जिल्ह्यात २०२३ वर्षात कुष्ठारुग्णांना संघटीत करून स्थापन  झालेल्या नंदुरबार जिल्हा कुष्ठांतेय फोरमला सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची नंदुरबार जिल्हा शाखा म्हणून मान्यता देण्यात आली.
नंदुरबार जिल्हा शाखेचे प्रतिनिधी या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे अध्यक्ष उमाकांत शेंडे, प्रमुख पाहुणे तारकल बांबोळे, मिलिंद बारसिंगे,  मोतीराम चौधरी, अलर्ट इंडिया चे प्रकल्प समन्वयक अभिजीत कांबळे,  गुरुदेव भुरसे, नंदुरबार शाखेचे अध्यक्ष खंडेराव चित्ते, कोषाध्यक्ष योगेश साबळे, कुष्टांतेय अधिकार मंच च्या सदस्या वनिता बोरकर, संस्थेचे मार्गदर्शक आशुतोष प्रभावळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक गुणवंत वैद्य यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील संस्थेचे आजीवन सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे समयोचित मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करतांना अश्विनी नन्नावरे यांनी सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेने केलेल्या यशस्वी कार्याची यशोगाथा प्रस्तुत केली. कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन विद्यानंद दांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिमा  चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रावण हांडेकर, मिलिंद बारशिंगे, संदीप माटे  व सर्व समाज प्रवर्तक आणि संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]