प्रकल्प कार्यालयाच्या आर्थिक सहकार्याने नरेगा यंत्रणा करणार 23 सामूहिक वनहक्क ग्रामसभाचा कायापालट
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी(वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंतर्गत चंद्रपूर जिल्हात जवळपास 476 गावांना सामूहिक वन अधिकार प्राप्त झाले असून टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई च्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून यातील 100 गावांमध्ये काम सुरु आहेत. या प्रकल्पातूनच या गावांचे आराखडे देखील तयार करण्यात येऊन ते प्रकल्प कार्यालयाला सादर केले गेले आहेत. यातील काही प्राधान्य गावांच्या 16 ग्रामपंचायती तील 23  गावांना आराखड्यातील प्रस्तावित कामांना जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर आर्थिक सहकार्य प्रदान करणार आहेत. या अनुषंगाने विकास कामांना गती देण्यासाठी नरेगा यंत्रणा ने लवकरात लवकर कामाचे नियोजन करावे असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा जिल्हा परिषद चंद्रपूर मा. मधुकर वासनिक यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना दिले. जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रम अधिकारी नरेगा, तांत्रिक अधिकारी नरेगा यांच्या मासिक बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सामूहिक वनहक्क क्षेत्रात मत्स्य तलाव, फळ झाडे लागवड, बांबू, तूती लागवड करणे, इ कामे घेण्यात यावी अशा सूचना देखील करण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]