शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस केला साजरा
मूल :- सामाजिक उपक्रम राबवणे हाच वाढदिवस साजरा करण्या चा उद्देश असतो.*वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करतासुशी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित केले.यामध्ये बुक पेन व खाऊ चे वाटप करण्यात आले.*
सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. *अनावश्यक खर्चाला फाटा देत कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री हसनजी वाढई यांच्या वाढदिवस सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला असून, हार-फेटे, पुष्पगुच्छ, फटाके, साऊंड सिस्टिम, डीजे या गोष्टीला टाळून समाजात चांगला संदेश देण्याचे काम वाढदिवसाच्या माध्यमातून करण्यात आले. सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे. क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे.माळी समाजाचा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजातील रांजल्या- गांजलेलया, पिचलेल्या लोकांना आधार देण्याचे काम नेहमीचं श्री हसनभाऊ करत असतात , इथून पुढच्या काळात वाढदिवस थाटामाटात न करता वाढदिवस सामाजिक कार्यातून केला जाणार आहे याची शाश्वती हसन भाऊ यांनी दिली. *यावेळी लहान मुलांच्या हस्ते केेक कापन्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विषयशिक्षक मा.प्रशांत बांबोळे यांनी केलें आभार प्रदर्शन उपसरपंच पाटील वाळके ग्रा.प सुशी यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.फुटाणे मॅडम प्रभारी उ.श्रे.मु. सुशी प्रमुख अतिथी.माधवनजी मांदाळे सदस्य शा ण्य समिती, जितेंद्र टिकले, नरेश वाढई,आकाश येसनकर,प्रणित पाल, सौरभ वाढई,निहाल गेडाम, प्रविण बोबाटे, वैभव सोया म,हेमंत सोनक, यश लेन गुरे, संदेश निमगडे यांच्यासह नागरिक उपस्थित हवाढदिवसाच्या दिवशी आर्थिक उधळपट्टी करीत वाढदिवस साजरा करणारे अनेक जण असतात. पण लहान मुला-मुलींच्या चेहर्‍यावर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आनंद फुलविणारे फारच कमी असतात. 'वाढदिवस' लहान मुला मुलीं बरोबर साजरा केला आणि जगातील सगळ्यात सुंदर गिफ्ट त्यांनी मला दिल ते म्हणजे 'आनंद' आणि 'समाधान या मुला-मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य फुलल्याने आपला वाढदिवस खर्‍या अर्थाने साजरा झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]