करोलीत बीएसएनएल टॉवर बांधकामाचा खड्डा ठरतोय जीवघेणा - काम सोडून कंत्राटदाराचा पोबारा

करोलीत  बीएसएनएल टॉवर बांधकामाचा खड्डा ठरतोय जीवघेणा - काम सोडून कंत्राटदाराचा पोबारा
सावली - करोली येथे बीएसएनएल टॉवर उभारणीसाठी खड्डा खोदला. साहित्य टाकले मात्र काम न् करताच कंत्राटदाराने साहित्य उचलून नेल्याने खड्डा तसाच राहिला. या खड्डयामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.
     तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या करोली येथे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीमार्फत गावानजीक टॉवरसाठी बांधकाम सुरु करण्यात आले. शिवम सिंग नामक कंत्राटदाराने जेसीबी मशीनद्वारे 15 फुट खोल खड्डा खोदला. गिट्टी, रेती, लोहा हे साहित्य टाकण्यात आले. मात्र काही दिवसातच गावकऱ्यांना माहिती न देता सदर कंत्राटदाराने सर्व साहित्य उचलून नेले. मात्र खोदलेला खड्डा न बुजविता तसाच ठेवल्याने खडयात लहान मुले, जनावरे पडून जीवितहानी होण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते संजय गेडाम व गावकरी व्यक्त करीत आहेत. 
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]