सावलीच्या ठाणेदारांवर फुलांचा वर्षाव - बदलीनंतर निरोप समारंभ संपन्न

सावलीच्या ठाणेदारांवर फुलांचा वर्षाव - 
बदलीनंतर निरोप समारंभ संपन्न
सावली - सावली पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांची बदली झाल्याने सहकारी पोलीस व जनतेनी फुलांचा वर्षाव करीत भावनिक निरोप दिला. याप्रसंगी त्यांचा सहपत्निक सत्कार करण्यात आला.  निरोप समारंभात त्यांच्या कार्याबाबत अनेकांनी कौतुक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राठोड यांचीही बदली झाल्याने त्यांनाही निरोप देण्यात आला. 
     सावली पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी आशिष बोरकर पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाले. त्यांनी जनतेशी नाळ जुळवत थेट लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलीस पाटील, सरपंच, आपदा ग्रुप व गावातील युवांसोबत संवाद साधला. युवकांच्या भरती परीक्षा मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे युवांना जोडण्याचे काम केले. पोलीस वर्धापन दिनांनिमित्त चला एकत्र येऊया.. या ब्रीदवाख्याने सद्भावना क्रिकेट चषकाच्या माध्यमातून सर्व शासकीय विभाग व जनतेला एकत्र आणून जोडण्याचे कौतुकास्पद कार्य दोन्ही वर्षी केले. तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन सावली येथे निरोप समारंभ पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, नवीन पोलीस निरीक्षक राजगुरू, नगराध्यक्ष लताताई लाकडे, पाथरीचे पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, डॉ. देशमुख उपस्थित होते. सर्व पोलीस कर्मचारी व नागरिकांनी त्यांचेवर फुलांचा वर्षाव करीत निरोप दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]