पवनी नागरीक संघर्ष समितीचे साखळी उपोषण शुरू

२६ जानेवारी ला आत्म दहनचा दिला इशारा

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी नागरिक संघर्ष समिती चे साखळी उपोषण शुरू असून विदर्भाची काशी तशी शांतच अशी म्हण आहे पण आमच्या हक्काच्या सोयी सुविधा जर आम्हाला मिळत नसेल तर.. आम्ही काय करायचे असा ? नागरिकांना पडला आहे.प्रसाशनाने काही कामाची मंजूरी देऊन आर्थिक अडचणी चा मुद्दा दूर होऊन सुध्दा जर प्रत्यक्षात लोकांचा हिताचा कामाला दिरंगाई होत असेल तर.. आम्ही काय करायचे? हे प्रश्न चिन्ह घेऊनच पवनी नागरिक संघर्ष समितीने उपजिल्हा रुग्णालय बांधकाम मधे शासन प्रशासन कडून होत असलेल्या दिरंगाई ला कंटाळून आत्म् दहणाचा इशारा दिला आहे. पवनी नगर परिषद ची स्थापना होऊन १५० वर्षाचा पलीकडे झाले पण सुविधा मात्र तुटपुंज्या. ह्याला जवाबदार कोण? उपजिल्हा रुग्णालय जागे होण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला, त्याच्या मंजूरी करिता ही संघर्ष करावा लागला, आणि आता तर भूमिपूजन होऊन महिन्या वर महिने लोटत चालले तरी शासन प्रशासन कुंभकर्णी झोपी गेलेले आहेत, ह्यांना खडबडून जागे करण्या करिता हे साखळी उपोषण शुरु केले आहे. आपल्याच देशात आपल्याच मुलभूत सुविधा करिता आत्मदहन करावे लागत असेल तर ..? आम्ही सर्व पवनी वासीय नागरिक संघर्ष समिती तर्फे पवनी नगर व तालुका वासियांना जागे होण्यासाठी आवाहन केल्या गेले की जागे व्हा.. आता नाही तर कधीच नाही.. आपला हक्क मिळवण्या करिता एकत्र येण्याची गरज आहे. परंतु शासन दरबार याकडे दुर्लक्ष करीत असून जनतेला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने २६ जानेवारी २०२४ पासून उप जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू न झाल्यास पवनी नागरिक संघर्ष समितीच्या वतीने सदस्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला.यावेळी उपोषणात यादव भोगे, राजेश नांदूरकर, हर्षल वाघमारे, माधुरी तलमले, लियाकत अली, अरुण असई, तबरेज सय्यद, राहुल पुंडे, संजय पुरी, महेश बोरकर, किशोर सावरबांधे, संजीव भुरे व आदी समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]