श्रीगुरुदेव सेवा मंडळ पेंढरी (कोके) च्या वतीने जिल्हास्तरीय कीर्तन महोत्सव संपन्न

पेंढरी कोकेवाडा (प्रतिनिधी)-
  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या५५ व्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने पेंढरी ,कोकेवाडा, मुरपार या तीनही गावाच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने हनुमान देवस्थान पटांगणावर  जिल्हास्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .    कीर्तन महोत्सवात  प्रामुख्याने सुधाकर चौधरी,  विठ्ठल वाढई ,  नामदेव बावणे , गुलाबराव गायकवाड , शरद सहारे,  मारोती कापटे,   सौ.कविता चांदेकर , प्रेमदास वनस्कार, गंगाधर चौधरी,  गोविंदा मेश्राम,  गवते महाराज,  केशव पोहीनकर, चेतन ठाकरे, सुभाष नन्नावरे,देवराव भुर्रे,  सुखदेव धारणे, बाबुराव गेडाम, महादेव मगरे ,  प्रेमलालशहा आत्राम,  टीकाराम वाघ , अरुण पेंदाम,  चरणदास पोईनकर ,परशुराम उईके  , खेमराज कापसे , सुखदेव उरकुडे आदी २५  कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा प्रस्तुत केली. या संमेलनाच्या समारोपप्रसंगी सर्व कीर्तनकारांना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामगीताचार्य विजय लाडेकर, गणेश मांडवकर , माजी पं. स. सदस्य चंद्रकांत शिंदे, माजी सभापती अरविंद राऊत, पोलीस पाटील ईश्वर सोनुले, सत्वशीला राऊत, मंडळाचे अध्यक्ष विलास चौधरी, तंटामुक्त समितीचे सुधाकर चौधरी, अमोल वाळके, स्वागताध्यक्ष गुलाबराव चौधरी, भारतीय सेनेतील सैनिक दिनेश गुरनुले यावेळी उपस्थित होते.
यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पेंढरी कोकेवाडा मुरपार ही तिन्ही गावे एकत्र येऊन स्वच्छता अभियान, साहित्य विषयक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे.सामुदायीक कार्याने  गावाला तीर्थ बनविण्यासाठी केलेला हा सातत्यपूर्ण प्रयत्न ग्रामोन्नती कडे नेणारा आहे. कीर्तन संमेलनामुळे अनेक प्रबोधन करणारे कीर्तनकार पुढे आले, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 
      दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवा मंडळाच्या वतीने ग्रामस्थांनी सामुदायिक ग्रामसफाई केली. तसेच ग्रामगीतेच्या ४१  अध्यायात दिलेल्या फोटोचे अनावरण सुद्धा सामुदायिक प्रार्थना मंदिरामध्ये करण्यात आले. तसेच ग्रामगीता ग्रंथांचे पठण व पूजन सामुदायिक रीतीने करण्यात आले .
    महिला मेळाव्यात ज्येष्ठ कवयित्री सौ.  शशिकला गावतुरे मुल , सौ.  रजनी बोढेकर चंद्रपूर, माजी सरपंच छबुताई  शिंदे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी मंदाबाई चौके , ममीता शेंडे,  नगीना आत्राम,  गीता भैसारे, रंजना आंबडारे, सुनंदा कोटरंगे,  अनुपमा सूर्यवंशी , शामलता चौधरी, अलका वाढई, पार्वताबाई गुरनुले आदी महिला  उपस्थित होत्या. या कार्यक्रमात गावात दारूबंदीच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्या शीला सहारे , दिपाली कोटरंगे ,शोभा कोकोडे यांना  सन्मानित करण्यात आले. तर  भावगीत स्पर्धेचे पारितोषिक प्रेमीला गुरुमुले,  पूजा मांदाडे,  दिपाली कोटरंगे यांनी प्राप्त केले. या तीन दिवसीय कार्यक्रमात सामुदायिक ध्यान - प्रार्थनेवर ग्रामगीताचार्य प्रेमदास मेंढुलकर,  गुलाब गायकवाड महाराज,  भास्कर वाढई , अरुण पेंदाम ,प्रा.  नीलकंठ लोणबले  यांनी सेवा  दिली तर मौन श्रद्धांजलीच्या प्रसंगी ग्रामगीताचार्य प्रा. राम राऊत, विलास बोरकर, बातुरवार गुरूजी यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन भास्कर वाढई यांनी केले तर आभार  विलास चौधरी यांनी मानले . वार्ड स्वच्छता स्पर्धेचे प्रथम पारितोषिक  जय भोले वार्ड क्र .४ यांनी प्राप्त केले .सप्तखंजिरी वादक इंजि. उदयपाल वनीकर  यांचे जनप्रबोधनपर कीर्तन संपन्न झाले. त्याचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला. रात्री जागृती भजनात पेंढरी कोकेवाडा,  मुरपार,  पेठ केवाडा,  गोंदोडा , हरणी मोटेगाव,  खुटाळा,  खांबाळा,  मदनापूर,  विहीरगाव , करबडा,  वाघेडा,  कळमगाव ( गन्ना),  वडसी,  विहीरगाव इत्यादी गावच्या भजनी मंडळांनी आपली सेवा अर्पण केली.तर गोपाल काल्याचे कीर्तन खेमराज कापसे महाराज यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]