नवीन ठाणेदार अजित सिंग देवारे यांचे स्वागत, तर तात्कालीन ठाणेदार मंगेश भोयर यांना निरोप.नवीन ठाणेदार यांचे स्वागत तर जुन्या ठाणेदाराना निरोप.
(महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा तळोधी यांच्या वतीने नवीन ठाणेदार अजित सिंह देवरे यांचे स्वागत आणि बदलून जाणारे ठाणेदार मंगेश भोयर यांना निरोप.)

(तालुका प्रतिनिधी) यश कायरकर:-

पोलिस स्टेशन तळोधी येथे नविन ठानेदार अजितसिंग देवरे नुकतेच रुजू झाले. तर आजपर्यंत रुजू असलेले तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांची जिल्हा बदली झाली. निवडणुकांचे तोंडावर पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आले असल्याने माजरी पोलीस स्टेशन येथून बदलून अजितसिंग देवरे यांना तळोधी पोलिस स्टेशन येथे बदली करण्यांत आलीं. रुजू असलेले तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांची जिल्हा बदली वर्धा जिल्ह्यात झाली.


     तळोधी पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले व नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीमध्ये अग्रेसर राहून परिसरातील लोकांच्या सहकार्याने नवीन पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती लगत लाखो रुपयांचा खर्च वाचवून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात ग्राउंड ची निर्मिती करून नवीन पोलीस स्टेशनच्या उद्घाटन करण्याचा मानस आखात असलेले व मनमिळाऊ व लोकांशी सहकार्याच्या भावनेने वागणारे ठाणेदार मंगेश भोयर यांची निवडणुकीच्या काळात जिल्हाभरात झालेल्या पोलीस विभागातील बदलांमध्ये वर्धा जिल्हा येथे बदली झाली. सोबतच पी.एस.आय. गोवर्धन व पो.हवा. हंसराज सिडाम यांची मुल येथे तर पी.एस.आय. भास्कर पिसे यांची चिमूर पोलीस स्टेशन ला बदली होऊन ते सुद्धा आता पोलीस स्टेशन सोडून बाहेर जानार त्यामुळे त्यांना निरोप,.तर तळोधी पोलीस स्टेशनला रुजू झालेले नवीन ठाणेदार अजित सिंग देवरे यांचे पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा तळोधी च्या वतीने निरोप व स्वागत करण्यात आले.


यावेळी तळोधीचे तात्कालीन एक थानेदार तसेच दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस यांची बदली होऊन गेल्याने संपूर्ण नवीन पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याची जबाबदारी, व नवीन आवाहनही नवीन ठाणेदार अजित सिंग देवरे यांच्यावर आलेलं आहे. 
     यावेळी बदली होऊन जाणारे ठाणेदार मंगेश भोयर यांनी "ज्याप्रमाणे आम्हाला सहकार्य केले असे सहकार्य नवीन ठाणेदार साहेबांना सुद्धा कराल" असे मत व्यक्त केले. तर यावेळी बोलताना "तळोधी परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामंजस्याने प्रयत्न करेन." असे यावेळी नव्याने रुजू झालेले ठानेदार अजितसिंग देवरे यांनी तळोधी पत्रकार संघाने पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर प्रतिक्रिया दिली. यावेळी संजय अगंडे, मोनील देशमुख, राहुल रामटेके, भारत चुनारकर, यश कायरकर, अरून बारसागडे, दिवाकर कामडी, महेश काशिवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]