तहसील कार्यालयातच चोरीच्या रेतीने बांधकाम सुरू

वन व महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात कुठेही रेती घाट लिलाव झाले नसल्याने मोठ्या प्रमाणावर तालुक्यात रेती माफियांचा धुमाकूळ सुरू आहे.यामुळे रोड लगत राहणाऱ्या जनतेची ट्रॅक्टरच्या फाटक्या सायलेन्सर च्या कर्कश आवाजाने रात्रीची झोप उडाली आहे. याबाबत अनेक निवेदने विविध तक्रारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार व तलाठी यांना सुद्धा याबाबत ची तक्रार आणि माहिती असतांना सुद्धा हा प्रकार दैनंदिन सुरू आहे.मागील १२ दिवसा अगोदर दिनांक. ११/०१/२०२४ ला सायंकाळी ०७:३० ते ०८:३० च्या सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैध रित्या रेतीने भरलेली ट्रॅक्टर वाहने मौजा मेटेपार - कवडशी डाक येथे मुकेश दडवे राहणार शंकरपूर तसेच पवन गायकवाड राहनार किटाळी मक्ता यांचे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.यांच्यावर दंड ठोकून कारवाई करण्यात आली.परंतु सर्वसामान्य रेती चोरट्यांचे ट्रॅक्टर तलाठी पकडून तहसीलला जमा करतात तर गुंड प्रवृत्तीचे रेती माफिया तथा सत्ताधारी पक्षाच्या माफियांची ट्रॅक्टर पकडून सुद्धा सोडली जातात यामुळे महसूल अधिकारी यांची या रेती माफियांशी कुठेतरी साठ - गाठ असल्याचे स्पष्ट होते. असे नाही तर खरोखरच हे सत्य ठरत चिमूर तहसीलच्या आवारातील राजीव गांधी सभागृहालगत नवीन ईमारत बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी सर्रासपणे चोरीची रेती ट्रॅक्टर च्या सहाय्याने टाकल्या जात असल्याने महसूल प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आता या चोरट्या रेती माफियांवर कुठल्या प्रकारची कारवाई उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी करतील याकडे सर्व जनतेचे तथा माफियांचे लक्ष लागले आहे.आणि अगदी हाच प्रकार प्रादेशिक तसेच बफर वन परिक्षेत्र कार्यालय चिमूर च्या आवारात सुद्धा दैनंदिन सुरू असलेला बघायला मिळत आहे. त्यामुळे वनविभागाने सुद्धा या अवैध रित्या रेती वाहतूक करणाऱ्या माफियांकडे पाठ फिरवली असे यावरून लक्षात येत आहे. असेच सुरू राहिले तर जनतेनी दाद मागावी तरी कुठे असा ? जनतेला निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]