कुणबी महिला मंडळ मूलच्या वतीने हळदी कुंकू व समाज भगिनींचा सत्कार तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्नमकरसंक्रांतीचे औचित्य साधून कनकाई कुणबी महिला मंडळ मूलच्या वतीने दि.१८/१/२०२४ला हळदी कुंकवाचे कार्यक्रम योग भवन मूल येथे घेण्यात आले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजूळा कोरडे कार्यक्रमाचे उद्घाटक सुमन चिताडे प्रमुख पाहुणे सुषमा रडके सदस्य खैरे कुणबी समाज सुधारक नागपूर सर्व प्रमुख पाहूण्याच्या उपस्थित दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना रत्नमाला भोयर तर सुत्र संचालन सुधा चरडूके यांनी केले. सदर कार्यक्रमात समाज भगिनींचा व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या उन्नति व आत्मबल कसे वाढवता येईल या विषयी प्रमुख वक्त्या सौ. सुषमा रडके यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. सर्व समाज भगिनींनी संस्कृती कार्यक्रमात हिरीरीने भाग घेवून आपले कला कौशल्य सादर केले. या वेळी कनकाई महिला बचत गटाचे सदस्य रत्नमाला भोयर ,सुधा चरडूके,पुष्पा लाडवे, शशिकला मांडवकर, दिपाली मांडवकर,सुनिता बुटके,उषा गोहणे,वर्षा चिताडे, कविता झरकर,पपिता झरकर,संध्या शेरकी,संगिता नागापूरे शुंभागी भोयर मनिषा भोयर या सर्व बचत गटाच्या महिलानी खूप मोलाचे सहकार्य केले. या वेळी मान्यवरांनी असेच कार्यक्रम घेवून महिलांना नक्कीच जागृत करण्याचे संकल्प त्यानी आपले मनोगतातून व्यक्त केले.

औचित्य हळदी कुंकवाचे! पर्व आनंदाचे!! ध्येय महिला उन्नतीचे!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]