तीन महिन्यापासून रोहयो मजुरांची मजुरी थकीत - कामासाठी परप्रांतात मजुरांची धाव

  तीन महिन्यापासून रोहयो मजुरांची मजुरी थकीत - कामासाठी परप्रांतात मजुरांची धाव
सावली - राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या मजुरांची मजुरी मागील तीन महिन्यापासून थकीत असल्याने मजूर तेलंगाना, कर्नाटक या राज्यात भात  रोवणीच्या कामासाठी जात आहेत. त्यामुळे अकुशल मजुरांची मजुरी देण्यात यावी ही मागणी होत आहे.
      ग्रामीण भागातील अकुशल मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, व वेळीच कामाचा दाम मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जिल्ह्यात अनेक कामे होत आहेत. "मागेल त्याला काम व वेळीच दाम" अशी ब्रीदवाक्य महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कामासाठी आहे. कामे केल्यानंतर हप्त्याभरात मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा करण्याची तरतूद आहे मात्र मागील तीन महिन्यापासून काम केलेल्या मजुरांना मजुरी मिळत नसल्याने महागाईच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना मजुरांना करावा लागत आहे. तेलंगाना, कर्नाटक या राज्यात भात रोवनीचे कामे सुरु असल्याने मजुरांचा कल वळला आहे. त्यामुळे काम केलेल्या मजुरांची मजुरी वेळीच देण्याची मागणी मजुरांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]