मका बियाणे उगवले नाही - शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार

मका बियाणे उगवले नाही -  शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार
सावली - रब्बी हंगामाकरिता धान पिकानंतर मका पिक घेण्यासाठी रेतवारी येथील शेतकरी ऋतविक संजय भांडेकर या शेतकऱ्याने पाच एकरमध्ये मका पिकाची पेरणी केली मात्र 15 दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही बियाणे उगवले नसल्याने याबाबतची तक्रार सदर शेतकऱ्याने पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालयाकडे केली आहे.
       धान पिक निघाल्यानंतर रब्बी हंगामात मका हे पिक मोठ्या प्रमाणात व्याहाड खुर्द परिसरात घेतल्या जात आहे. ऋतविक भांडेकर या शेतकऱ्याने रेतवारी शिवारात असलेल्या शेतीत मका पिक लावण्याकरिता व्याहाड खुर्द येथील एका कृषी केंद्रातून धरती ऍग्रो  कंपनीचा फेंटास्टीक मका चे १२ बॅग खरेदी केले. शेतीची पूर्ण मशागत करून 27 डिसेम्बरला पेरणी केली मात्र 15 दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही मका वाण हा उगवला नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मशागत व बियाणे करिता हजारो रुपये खर्च झाले. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र व बियाणे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी तक्रारिद्वारे पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]