जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामसभा रोहयो ची अंमलबजावणी करणार

अखेर नऊ गावच्या ग्रामसभांना रोहयोच्या कामांना मंजुरी./नऊ गावांमध्ये मिळालेल्या सामूहिक वनावर होणार वृक्षारोपण
नागभीड:
नागभीड तालुक्यातील एकूण 54 गावांना सामूहिक वन हक्क दावे मिळाले. मिळालेल्या वनाच्या जागेचे संवर्धन व अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील बहुतेक गावात सामूहिक वन्य हक्क व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आले. मागील वर्षी त्या समित्याने स्वतंत्ररीत्या तेंदु पत्ता संकलन सुद्धा करून ग्रामसभेच्या विकास कामाला हातभाuhjhर लावला. त्यानंतर नरेगाचे काम करण्यासाठी 12 गावे पोर्टलवर आली व त्यांना वृक्षारोपन करण्यासाठी मान्यता सुद्धा मिळाली.                                            30 नोव्हेंबर 2021 या शासनाच्या परिपत्रकानुसार सामूहिक वन हक्क दावे मिळालेल्या गावांना रोजगार हमी योजनेची नोडल एजन्सी म्हणून मान्यता मिळाली. त्याच परिपत्रकाचा आधार घेऊन धामणगाव चक, कोरंबी, कसरला, सावरला, हुमा, मांगरूळ, खरबी ,खडकी ,सारंगगड या गावाने आपली ग्रामसभा पोर्टलवर आणून चिन्हांकित कामांची यादी ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि तहसील कार्यालमध्ये सादर केली. त्यानंतर पंचायत समितीने प्रस्तावित कामाचे इस्टिमेट तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी तहसील कार्यालयामध्ये पाठविले लगेच तहसीलदार माननीय चव्हाण साहेबांनी प्रशासकीय मान्यता देऊन वर्क ऑर्डर सुद्धा काढले .त्यामुळे आता मिळालेल्या वनामध्ये वृक्षारोपण करून वनांचे संवर्धन करणे व लोकांच्या हाताला काम मिळणार म्हणून तालुक्यातील ग्रामसभा मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे .यामध्ये रिवार्ड संस्था नागभीड, तहसीलदार नागभीड ,व संवर्ग विकास अधिकारी नागभीड यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल ग्रामसभेने त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]