सम्यक मेश्रामची इस्रो प्रकल्प पाहण्यासाठी निवड तळोधी (बा.):
     तळोधी बा.येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात आठव्या वर्गात शिकत असलेल्या सम्यक वामन मेश्रामची कर्नाटक राज्यातील बंगलुरु येथील इस्रो प्रकल्प पाहण्यासाठी निवड झालेली आहे. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या सात दिवसात त्याला इस्रो प्रकल्प पाहण्याची संधी मिळणार आहे. या त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद तसेच आई वडिलांना दिले आहे. या त्याच्या निवडीचे संस्थासचिव मनीषा बारापात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]