सांस्कृतिक कार्यक्रम व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन.
 शेगाव /वरोरा... जगदीश पेंदाम
   
श्री साई विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, भिसी,डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भिसी,शॉवलीन पब्लीक अकॅडमी, भिसी,वसाई क्लासेस अकॅडमी, भिसी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक क्रिडा, प्रज्ञाशोध परीक्षा, सांस्कृतीक स्नेहसम्मेलन व बालआनंद मेळावा १० ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
 दि.१० जानेवारी ला सायंकाळी ७.०० वाजता सिपी अॅन्ड बेरार एज्यूकेशन सोसायटी कोंढाळी नागपूर चे प्रशासकीय अधीकारी प्रा.अशोक कष्टी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ओबीसी आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजयुमों प्रदेश सचीव मनिष तुम्पल्लीवार, किशोर मुंगले,भिसी अप्पर तालूक्याचे तहसिलदार दिनेश पवार,मिनादास मोहरकर,प्रशांत चिडे, चिमुर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक मनोज गभणे, भिसी पो. स्टे. चे उपनिरीक्षक प्रकाश राऊत, राजू बानकर, किशोर नेरलवार, पंकज मिश्रा, गणेश गभणे उपस्थीत होते.
तिन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्या नंतर विद्यार्थ्यांनी समुह नृत्य, एकल नृत्य, नाटीका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी सकाळी  प्रज्ञाशोध परिक्षा, स्लो सायकल स्पर्धा,लांब उडी, क्रिकेट, कबड्डी या खेळांचे अंतीम सामने घेण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
  तिसऱ्या दिवशी  दि. १२ जानेवारी ला सकाळी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी विवीध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून त्यांची विक्री केली.
           सायंकाळी तिन दिवसीय कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा चिमुर तालूका अध्यक्ष राजुपाटील झाडे यांनी उपस्थीत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थाना विवीध स्पर्धांचे बक्षीस वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी मंचावर भिसी न.पं. च्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रीया राठोड, डॉ. प्रियंका कष्टी,भाजपा महीला आघाडी चिमुर तालूका अध्यक्ष मायाताई नन्नावरे, भाजयुमों चिमुर तालुका माजी अध्यक्ष किशोरभाऊ मुंगले, माजी जि.प. सदस्य पार्वताताई गभणे,गिताताई लिंगायत, वैशालीताई बलदुवा, आशाताई मेश्राम, मंजुश्रीताई मुंगले, निलेश गभणे, पत्रकार विलास कोराम, संस्थेचे उपाध्यक्ष पंकज मिश्रा,सचीव गणेश गभणे, अशोक पाठक, डॉ. रोहीत उंडाळ, तुळशीदास महाकाळकर, नितीन कायरकर व विद्यार्थी, पालक उपस्थीत होत
विद्यार्थ्यांच्या आईं साठी घेण्यात आलेली रांगोळी स्पर्धा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. यात भाग घेतलेल्या पांच स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]