जांबूळधरा ठरतेय नैसर्गिक पर्यटनाचे आकर्षण
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत जांबूळधरा हे गाव जिल्ह्यापासून सुमारे ८५ कि.मी तर कोरपना या तालुक्याच्या ठिकाणा पासून १५ कि.मी.अंतरावर वसलेले छोटेसे गाव आहे.  डोंगराळ व नैसर्गिक सौदर्याने नटलेले हे गाव आहे. गावात एकूण ३३ कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या १३९ आहे. ३० कुटुंब आदिवासी समुदायाची व ३ इतर पारंपारिक निवासी आहेत. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम  २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये जांबूळधरा गावाला सामूहिक वन हक्क मिळाले आहेत. ३० कुटुंब संख्या असलेल्या या आदिवासी बहुल गावाला २०१८ मध्ये सर्वे नं. १४/१ मध्ये ६६३.९४ हे आर क्षेत्राचे सामूहिक वन अधिकार प्रपत्र मिळाले आहेत. वन हक्क कायदा २००६ अन्वये ग्रामसभेला गौण वन उपज गोळा करणे, संकलन करणे, त्याची विक्री आणि विल्हेवाट लावणे या संबधीचे अधिकार दिले आहे त्यासोबतच वन क्षेत्राचे व्यवस्थापन करण्याचा सुद्धा अधिकार प्रदान केले आहे. ग्रामसभेची कर्तव्य देखील सांगितले आहे. या सामूहिक वन हक्क क्षेत्रात एकूण ६ नैसर्गिक धबधबे आहेत आणी पावसाळ्यात याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. आणि पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करते. याचे सुव्यवस्थित व्यवस्थापन करुन उपजीविकेच्या संसाधनात वाढ करुन जीवनमान उंचाविले जावे आणि सामाजिक आरोग्य सुधारणा व्हावी म्हणून ग्रामसभा जांभूळधरा यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या मार्गदर्शना खाली या क्षेत्राचे पर्यटन स्थळ विकासाचे कार्य हाती घेतले असून यातून रोजगाराच्या संधीत देखील वाढ करण्याचा मानस केला आहे. २०१८ ते २०२१ या कालावधी पर्यंत गावात वन हक्क कायदा विषयी फारशी जाणीव जागृती झालेली नव्हती. सामूहिक वन हक्क मिळून देखील समिती गठीत करण्यात आलेली नव्हती. अशा परिस्थितीतच जानेवारी २०२२ पासून टाटा सामाजिक विज्ञान संस्थान चे प्रतिनिधी अमोल कुकडे आणि जगदीश डोळसकर सामूहिक वनहक्क या विषयावर या गावात काम करू लागले. गावातील लोकांमध्ये हळू हळू विश्वास निर्माण होताना दिसून आला आणि याचे फलित म्हणजे आता ग्रामसभा एकत्र येऊन पर्यटन विकास करण्यासाठी सज्ज होत आहे. पर्यटकांना गावापर्यत सहज पोहचता यावं यासाठी दिशा दर्शन आणि अंतर दाखविणारे फलक कोरपना पासून ते जांबूळधरा गावपर्यंत लावलेले आहेत. पर्यटकांना मोफत वाहन पार्किंग व्यवस्था देण्यात आलेली आहे. वॉटर फॉल पाहण्यासाठी नाममात्र शुल्क पावती घेण्यात येत आहे जेणे करुन परिसर स्वच्छ ठेवता येईल. ग्रामसभेने पर्यटकासाठी काही नियमावली देखील केलेली आहे. विशेषतः पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांना धबधबा रस्ता दाखविण्यासाठी गाईड ची नेमणूक केलेली आहे.
भविष्यात राज्यात हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येताना दिसून येईल यात शंका नाहीत.

अमोल प्रभाकरराव कुकडे - 7875874451
जगदीश तानाजी डोळसकर - 9890707579
संशोधन अधिकारी 
टाटा सामाजिक विज्ञान संस्थान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]