जुन्या जन्म मृत्यू नोंदीसाठी पायपीट - मुल उपविभागीय कार्यालयात शेकडो प्रस्ताव प्रलंबित

जुन्या जन्म मृत्यू नोंदीसाठी पायपीट - मुल उपविभागीय कार्यालयात शेकडो प्रस्ताव प्रलंबित
सावली -  एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या जन्म मृत्यू ची नोंद करण्यासाठी दाखल केलेल्या एकाही अर्जावर कार्यवाही होत नसल्याने शेकडो प्रस्ताव आदेशाविना मुल उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत. यामुळे कार्यालयाच्या चकरा अर्जदारांना मारावे लागत आहे.
      प्रत्येक शासकीय कामासाठी जन्म- मृत्यू दाखल्याची गरज असते परंतु एकादेवेळी नोंदणी करायचे विसरले असल्यास तालुका न्यायालयात अर्ज दाखल करावे लागत होते. या प्रक्रियेत वेळ व पैसा खर्च होत होता. भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाने यात सुधारणा करून 11 ऑगष्ट 2023 चे राजपत्रात जन्म- मृत्यू नोंदणी करण्यास एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाल्यास नोंदणी करण्याचे आदेश देण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना दिला आहे. उपविभागीय दंडाधिकारी हे सहानिशा करून संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांना जन्म - मृत्यू नोंदणी करण्याचे आदेश देतील. याबाबत कार्यवाही करण्याचे पत्र चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले आहे. मात्र 3-4 महिन्यापासून जन्म - मृत्युचे शेकडो प्रस्ताव मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले असतांना एकही प्रस्ताव निकाली काढले नाही. प्रकरणे जास्त प्रमाणात दाखल झाल्याने उपविभागांतर्गत तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव वर्ग करण्यात आले मात्र त्यानंतर आणखी ती प्रकरणे परत बोलावून घेतले आहे. इकडून- तिकडे प्रकरणे हलविण्याच्या प्रक्रियेत निकाली काढत नसल्याने अर्जदारांची दमछाक होतांना दिसत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]