चमत्कारांच्या नावाखाली लुबाडणाऱ्यांना बळी पडू नका! -यश कायरकर


 खडकी येथे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रमाचे स्वाब संस्था व अ.भा‌.अनिस च्या वतीने आयोजन.
 नागभिड:
  नागभीड तालुक्यातील गट ग्रामपंचायत किटाळी (बोर.) मधील खडकी या गावांमध्ये काल 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या निमित्ताने जि.प. शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वाब संस्था व अ‌.भा. अनिस यांच्यावतीने 'चमत्कार, बुवाबाजी व अंधश्रद्धा' या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन अंधश्रद्धे बद्दल जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.
  या कार्यक्रमाकरिता अ.भा. अनिस शाखा तळोधीचे युवा संघटक नितीन भेंडाळे यांनी समितीची भूमिका समजावून सांगित ''आमचा देवाधर्माला विरोध नाही मात्र देवाधर्माच्या नावाने जे समाजातील प्रत्येक घटकाची आर्थिक, शारीरिक व मानसिक पिळवणूक करतात त्यांच्याबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते." असे समजावत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. 
तर  प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभा अनिस नागभीड चे तालुका संघटक व स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगांचे सादरीकरण करून चमत्कारांबद्दल पोलखोल करीत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आगपेटीची काडी न लावता हवन पेटवून कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर हवेत हात फिरवून हवेतून चैन काढून दाखवली. व या प्रयोगाबद्दल सांगताना असे जो व्यक्ती सोन्याची चैन किंवा, अंगठी अशा वस्तू हवेतून काढत असेल त्याला धानाचा पोता किंवा ट्रॅक्टर ही हवेतून काढायला सांगा असं समजावत असी कोणतेही वस्तू मंत्राच्या साहाय्याने हवेतून काढता येत नाही जी वस्तू लपवता येते तीच वस्तू हात चालाखी ने बाहेर काढता येते असे सांगितले.  
        यानंतर लिंबातून रक्त काढणे ,अगरबत्तीच्या सहाय्याने हरवलेली वस्तू शोधणे, स्वर्गातून आनून पुर्वजांना पाणी पाजणे,  पाण्याचा प्रसाद बनवणे, जाभेतून आरपार त्रिशूळ काढने, असे विविध प्रयोग करीत त्याबद्दल पोलखोल करून सांगितले. व "असे कोणतेही चमत्कार कुणालाही करता येत नाही. काही चमत्कार हे रासायनिक क्रियेतून निर्माण होतात, तर काही हात चालाकीने केले जातात. त्यामुळे कोणत्याही चमत्कारांना बळी पडून चमत्कार करणाऱ्यांच्या ढोंगी बाबा पासून सावधान राहायला हवे व त्यांच्या नादाला लागून आपली लुबाळणूक करून घेऊ नका." असे यावेळी सांगितले.
        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कितारी ग्रामपंचायतचे सरपंच छगन कोलते व प्रमुख अतिथी म्हणून स्वाब संस्थेचे सहसचिव हितेश मुंगमोळे, छत्रपती रामटेके, सुरज भाकरे, भोलेनाथ सुरपाम, शुभम निकेशर, अमन करकाळे, विनोद लेनगूरे, आमिर करकाळे, व इतर सदस्य उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, गावातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]