२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तहसिल कार्यालय चिमूर येथे सांस्कृतीक कार्यकम संपन्न

श्री संत भय्युजी महाराज विद्यालय, चिमूर ने पटकाविला प्रथम क्रमांक

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - तहसिल कार्यालय, चिमूर च्या वतीने दि.२६ जानेवारी २०२४ रोज शुकवारला सांस्कृतीक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार, किर्तीकुमार उर्फ बंटी भाऊ भांगडिया (आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र) , उपविभागीय अधिकारी चिमूर , राजमाने तहसिलदार, चिमूर , डॉ. सुप्रीया राठोड, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिमूर , कांबळे गटशिक्षण अधिकारी पं.स. चिमूर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात चिमूर मधिल १३ शाळा सहभागी झाल्या होत्या, यामध्ये श्री संत भय्युजी महाराज विद्यालय, चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपुर या शाळेनी प्रथम कमांक पटकाविला या सामुहिक नृत्यात सहभागी विद्यार्थी कु, शुभांगी राणे, कु, साक्षी चौखे, कु आर्या रासेकर, कु, प्राची दोडके, कु, जान्हवी जिवतोडे, कु. आदिती मेश्राम, कु. श्रावणी मेश्राम, कु.सोनिया गजभे, कु.श्रेया नन्नावरे, कु.लक्ष्मी वाकडे, कु, श्वेता गजभिये, कु.मानसी राजनहिरे, कु.विजया नन्नावरे, अर्णव चावरे या सर्व विद्याथ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, एस.बी.पिसे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]