सावरला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम.
तळोधी (बा.):
     नागभीड तालुक्यातील व तळोधी बा. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या  सावरला येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती समारोह साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. तसेच संपूर्ण गाव श्रमदानातून स्वच्छ करण्यांत आला. व सायंकाळला प्रबोधनात्मक अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमांला अध्यक्ष म्हणून ठानेदार मंगेश भोयर, तर मार्गदर्शक अ.भा.अंनिसचे नागभीड तालुका संघटक यशवंत कायरकर, तथा तळोधी बा. अ.भा. अनिस चे युवा संघटक नितीन भेडाळे, यांनी मार्गदर्शन केले.
 अंधश्रद्धा व बुवाबाजी यांवर मार्गदर्शन करताना अ.भा.अंनिस तालुका संघटक यश कायरकर यांनी बिना आगपेटीने होम पेटवून प्रयोगाची सुरुवात करीत हवेतून चैन काढणे, स्वर्गातून पाणी काढून, लिंबातून रक्त काढणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करीत "कोणतेही चमत्कार करून लोकांना लुबाळणाऱ्या भोंदू बुवा बाबा पासून सावधान राहायला हवे, कोणालाही हवेतून मंत्राच्या साहाय्याने वस्तू काढता येत नाही आणि जर असे कोणी करत असेल तर तो हात चलाखी करत असतो  व कोणत्याही भोंदू बुवा बाबांनी सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन एकमेकात तिढा निर्माण करून वादविवाद करू नका." असे सांगून 2013 च्या जादूटोणाविरोधी कायद्याबद्दल समजावून सांगितले. 


     सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव आता जाणवू लागला आहे मात्र तो पुर्णपणे प्रत्येक महिलांनी आचरणात आणावे असे नितीन भेंडाळे यांनी सांगितले. तर  महिला करीता खूप कायदे आहेत त्यांचा वापर करून संकटातून बाहेर पडता येईल, असं सांगित गावांत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ठानेदार मंगेश भोयर यांनी मार्गदर्शन केले. 


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील अपुर्वा मेश्राम यांनी केले तर प्रस्तावित स्विटी खोब्रागडे हिने केले. उपस्थितांचे आभार यामिनी कोसे हिने मानले. रेखा कोसे, सध्या रामटेके, सत्यवती अरसोडे, शेखर सडमाके, विनोद अरसोडे, जीवन गोपाले, कानुजी कोडापे, भजनदास मेश्राम,आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला गावांतील संपूर्ण महिला पुरूषांनी सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]