गोसेखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना आदेश

गोसेखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा -  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना आदेश 
सावली :-  सावली तालुक्यातील गोसेखुर्द लाभधारक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश पाळेबारसा येथे आयोजित केलेल्या शेतकरी बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. 
    गोसेखुर्द उपनलकेचे  काम करतांना शेतकऱ्यांना विश्वासात न घेणे, उभ्या पिकातून कोणताही मोहबदला  न देता काम करणे, चुकीच्या पद्धतीने काम करून शेतीला सिंचनापासून वंचित राहण्याची पाळी आणणे अशा विविध समस्यांचे शेतकऱ्यांचे निवेदन आले होते. या समस्या निकाली काढण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली पालेबारसा येथे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत बांधावर जाऊन त्या समस्या सोडविण्याचे आदेश वडेट्टीवार यांनी दिला.यावेळी तहसिलदार परीक्षित पाटिल, गोसेखुर्द चे अधिकरी , कांग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका कांग्रेस च्या अध्यक्ष उषाताई भोयर,  माजी तालुका अध्यक्ष्य राजेश शिद्धम, बाजार समितीचे संचालक निखिल सूरमवार यांच्या उपस्थिति शेतकरी समस्या विषय बैठक पार पाडली.
      शेतकरी समस्या विषय बैठकिचे आयोजन कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडे आणि युवा कांग्रेस चे उपाध्यक्ष सुशील डहलकर यानी केले होते तर या परिसरातील कांग्रेस चे कार्यकर्त विठ्ठल मंगर, शामराव वाघरे, श्रीकांत संगीडवार, धीरज उरकूडे, रोहन राउतकर, वामन दाजगाये, भगवान धुर्वे, रमेश तिवाड़े, प्रकाश खेडेकर,अनिल गुरनुले,  सचिन इंगुलवार, मनोहर पालपनकर, हरी वाढनकर आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]