धामणगाव चक येथे सावित्रीआई फुलें जयंती
तळोधी (बा.) रमाई महिला मंडळ तथा बौद्ध समाज धामणगाव चक यांचे विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती समारोह व भिमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांचे निमित्ताने गावातील मुख्य मार्गानें लिझिम पथकासह भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. आयोजीत कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रदिप पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून निकेश रामटेके, प्रेमदास जनबंधू, आनंद शेन्डे, मनिष शेन्डे, मनोहर खोब्रागडे, संतोष जनबंधू,जिजाबाई बोरकर,अर्चना पाटील, उपस्थित होते. समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल हंसराज बारसागडे यांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीमाई या़चे जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमांचे संचालन अक्षय मेश्राम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मीनल पाटील यांनी मानलें कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रमाई महिला मंडळ तथा बौद्ध समाजाचे पदाधिकाऱ्यांनी अधक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]