जिल्हा परिषद शाळेतील मुलांची शैक्षणिक सहल
तळोधी (बा.) वार्ताहर 
      पंचायत समिती नागभिड अंतर्गत येतं असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जनकापूर येथिल मुलामुलींची शैक्षणिक सहल गोविंदबाग कृषी पर्यटन (अड्याळमेंढा) येथे नुकतिच नेण्यात आली. या शैक्षणिक सहलिमधे विद्यार्थ्यांना परिसरात उगवणाऱ्या विविध जातींचे वनौषधी युक्त झाडांची ओळख, विविध प्राण्यांची ओळख, फळ, फुल, जल, जमीन, तथा जैवविविधता आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यांत आले. गोविंदबागचे मार्गदर्शक अँड गोविंद भेडांरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक सानिध्यात खेळीमेळीच्या वातावरणांत यावेळी दिवसभर विद्यार्थ्यांनी निसर्गाचा अभ्यास केला. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष परमेश्वर नान्हे, उपाध्यक्ष देवता सुर्यवंशी, सिआरपी सत्यवती रामटेके, शाळा समितीचे माजी अध्यक्ष राहुल रामटेके, मुख्याध्यापक यशवंत कामडी, सदस्य इंद्रजित गावतुरे, सुभाष गायधने, कपिल बारसागडे, सहाय्यक शिक्षक ढोरे, राजकुमार पाटील, दिवाकर सोनुले, आकाश कुर्जेकर, देवता मसराम शेभा मोहुर्ले तथा शाळा समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]