गायमुख देवस्थानातील गायमुखातून येणारे पाणी बंद होणे , चमत्कार नाही- अभाअंनिस व स्वाब संस्थेचा दावा.
 तळोधी (बा.) :
    चंद्रपूर जिल्ह्यात तळोधी - बाळापूर रोडवर प्रसिद्ध गायमुख तिर्थक्षेत्र आहे.या ठिकाणी दरवर्षी मकर संक्रांतीला यात्रा भरते. वर्षभर लोक पर्यटनासाठी जात असतात. त्याठिकाणी गायमुखातून सतत वाहत असलेलं पाणी कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय आहे.
नुकतेच काल सायंकाळी गायमुखातून वाहणारे पाणी बंद झाले. लोकांना हा चमत्कार वाटत आहे. याला जोडून अनेक कपोलकल्पित दंतकथा पसरविण्याचे कार्य सुरू आहे. आणि आज दुपारच्या वेळी ते पाणी पुन्हा झिरपत सुरू झाले आहे.
    "गायमुखातून वाहणारे पाणी बंद होणे हा चमत्कार नाही. मानवी हस्तक्षेपामुळे झाले आहे" असा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केला आहे.
      मागील अनेक वर्षांपासून  बाळापुर, पारडी व परिसरातील लोकांनी जंगल परिसरात गायमुखच्या पहाडीच्या वरील भागात  अतिक्रमण केले. जंगल तोडून उत्खनन सुरू केले. शेतीयोग्य जमीनी तयार केल्या व शेतकर्यांनी परिसरात सात ते नऊ  बोअरवेल मारल्या,भरीस भर  मागील दोन - तीन वर्षापासून सुरू असलेला रेल्वेच्या पुलाकरीता मोठ्या प्रमाणावर  बोअरवेल मारून प्रचंड पाण्याचा उपसा सुरू आहे. गायमुख पहाडी मध्ये असलेला पाणीसाठा व त्यातून वाहणा-या झ-याचे स्त्रोत हळूहळू कमी होत गेले.पारडी रस्त्याच्या उजव्या बाजूला गायमुख पहाडीच्या वर असलेल्या  तलावातील  पाणीसाठाही अतिक्रमण  शेतातील पिके घेण्याकरिता वापरतात. यामुळे गायमुखच्या वरील भागातील पाणीसाठा हा हळूहळू कमी होऊन   गायमुखातून वर्षानुवर्षी आलेला पाण्याचा प्रवाह हा हळूहळू कमी होत येऊन आज पूर्णपणे बंद झालेला होता. मात्र पाणी बंद झाल्याचे कळताच बोअरवेल आज बंद करन्यात आले व पाणी झिरपून पुन्हा थोडं प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र जर वरील बोरवेल बंद करण्यात आले नाही तर तो पाण्याची वाहतूक नेहमीसाठी बंद व्हायला वेळ लागणार नाही.
"मानवी अतिक्रमणामुळेच पर्यावरणाचा झालेला -हास हे गायमुख देवस्थानातून सतत वाहणारा पाणी बंद होण्यास एकमेव कारण आहे.' असे मत स्वाब नेचर संस्थेचे अध्यक्ष यशवंत कायरकर यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]