बस स्थानकाअभावी स्तनदा माता,गरोदर माता, विद्यार्थी, प्रवाशांचे हाल.... लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे दुर्लक्ष.....
वरोरा.....जगदीश पेंदाम

वरोरा,शेगाव ते चिमूर 353 ई राष्ट्रीय महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची कामे सुरू असुन या राष्ट्रीय महामार्ग 353 ई  मार्गावरील प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, स्तनदा माता, गरोदर माता,ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांचे  शेगाव,भेंडाळा,चारगाव,येथे रस्त्यावर बस स्टॉप नसल्यामुळे  रस्त्यावर उभे राहून तासोन तास शालेय विद्यार्थी, स्तनदा माता, गरोदर माता,ज्येष्ठ नागरिक,महिला प्रवाशांचे हाल होत आहे याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झालेले आहे...
 
शेगाव हे वरोरा तालुक्यातील मुख्य गाव म्हणून ओळख असून या गावची लोकसंख्या दहा हजार च्या वर आहे या ठिकाणी सोमवारला मोठा बाजार भरत असुन परिसरातील 60 ते 70 खेडे या गावाला जोडलेले आहे या ठिकाणी रोज परिसरात शालेय विद्यार्थी, शिक्षण घेण्याकरीता येत असतात तसेच स्तंनदा माता, गरोदर माता, दवाखाना उपचार करण्यासाठी रोज येत असतात तसेच इंडियन बँक, ग्रामीण कोकण बँक, सीडीसीसी बँक, मध्ये ज्येष्ठ नागरिक देवाणघेवाण, दवाखाना, दळणवळणसाठी रोज येत असतात परंतु सात वर्षा अगोदर या मार्गाचे रस्त्याचे बांधकाम करतेवेळी येथील बस स्टॉप संबंधित कंपनीने जमीन दोस्त केले तेव्हापासून बस स्थानक नसल्यामुळे परिसरातील स्तंनदामाता, गरोदर माता, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, महिला, यांना बसने प्रवास करते वेळी त्रास सहन करावा लागत आहे, बस थांबण्याची जागा निश्चित असून या ठिकाणी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, गरोदर माता, स्तंनदा माता, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांना आश्रय घेण्यासाठी ग्रामीण कोकण बँक, फ्रुट दुकान, फळे दुकान,पानटपरी, या ठिकाणी बसची वाट पाहत आश्रय घ्यावा लागतो. बस आली की लगेच प्रवेशांची धावपळ सुरू होते परंतु बस किती मागे पुढे जाणार याचा नेमका अंदाज नसतो अशावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, एकीकडे सरकारने महिला, ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी बसची वाट बघत असतात उन्हाळ्याचे सीजन मध्ये प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार हे मात्र तितकीच खरे, निवडणुकीच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी ग्रामीण जनतेला आश्वासन देत असतात मात्र हे आश्वासन खरे करण्यात त्यांना अपयश आलेले दिसून येत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]