पारधी समाजाचे खासदार रामदास तडस यांना निवेदन...

             
                                 वरोरा....जगदीश पेंदाम

पारधी विकास परिषदेचे महामंत्री  व महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कृत बबनराव  गोरामन यांच्या नेतृत्वाखाली पारधी विकास परिषद वर्धा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारीसंधुनाथ भोसले (अध्यक्ष वर्धा जिल्हा), सुभाष पवार  व जेष्ठ  अधीनाथ पवार (उपाध्यक्ष ,वर्धा) हिंदुराज भोसले( सचिव ) पंकज राऊत( सहसचिव) सामाजिक कार्यकर्ते धर्मराज भोसले इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारधी शिष्टमंडळाने 
 रामदास तडस खासदार, (वर्धा लोकसभा मतदार संघ) यांच्या निवास स्थानी भेट घेऊन वर्धा जिल्ह्यातील आदिवासी पारधी बांधवच्या सामाजिक - आर्थिक  समस्याबाबत व शासनाच्या विविध योजना पारधी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष कालबद्ध कार्यक्रमाचे आयोजन बाबत वर्धा जिल्ह्याचे दीपक हेडाऊ प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले पारधी समाजासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बेड्या पाड्यावर विशेष महाराजस्व अभियान राबवून जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र, आधार कार्ड, दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र, मतदान कार्ड, श्रमकार्ड, रेशनकार्ड इत्यादी  शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी राजस्व अभियान राबविण्यासाठी तसेच अतिक्रमण जमिनी नियमित करणे , प्रधानमंत्री घरकुल योजना , पारधी आवास योजना, बेडा जोडो अभियानांतर्गत प्रत्येक बेड्या मुख्य रस्त्यांशी जोडणे, बेडा तिथे शाळा अभियानांतर्गत वस्ती शाळा उभारणे व इतर प्रमुख मागण्या पारधी शिष्टमंडळातर्फे खासदार  व प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ साहेब यांना निवेदन देण्यात आलेपारधी समाजाच्या सर्व समस्यांवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात  जिल्हा प्रशासन यंत्रणेशी बैठक आयोजीत करून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन  खासदार रामदास तडस यांनी दिले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]