महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हळदीकुंकू स्नेहमिलन महिला मेळावा सप्पन्न 
 मेळाव्याला महिलांची लक्षनीय उपस्थिती
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल तर्फे हळदी कुंकू आणि स्नेह मिलन मेळावा आयोजित करण्यात आला.सदर मेळाव्याचे उद्घाटन  राजमाता आई जिजाऊ, त्यागमूर्ती माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान. नितीनभाऊ भटारकर यांनी केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रंजनाताई पारशिवे आणि प्रमुख अतिथी म्हणून  महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष अर्चनाताई बुटले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मूल शहर अध्यक्ष आकाश येसनकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहित कामडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यां सोनालीताई पोटवार, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष वासुदेव पिपरे, महेंद्र गोंगले, प्रशांत मेश्राम उपस्थित होते.
उपस्थित महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी हळदी कुंकू लावून भेट वस्तू भेट दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजनाच्या माध्यमातुन स्वतःचा आर्थिक सामाजिक विकास साधावा. अडचंणं आल्यास आम्ही आपल्या पाठीशी राहू असा शब्द दिला. यावेळी रजना पारशिवे यांनी सुद्धा महिलांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षांचे मुलं तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी उपस्थित महिलांना आवाहन करताना तुम्हाला अडचणी आल्यास फक्त या भावाची आठवण करा मी तुमच्या पाठीशी राहून समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन असा शब्द दिला.मेळाव्याचे प्रास्ताविक महिला तालुका अध्यक्ष संगीता गेडाम यांनी तर आभार आणी संचालन शहर अध्यक्ष धाराताई मेश्राम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]