का बघावा "बेबस"? चित्रपट निर्मात्याने सांगितलं नेमकं कारण!



विदर्भातील मातीतील कलावंताचा चित्रपट 
असल्यांने, बेबस हा चित्रपट सर्वांनी बघावा असे आवाहन या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत कृपाल लांजे यांनी केले. प्रेस क्लब मूलच्या वतीने आयोजीत विश्राम गृह मूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हे आवाहन केले. पत्रकार परिषदेला बेबस चित्रपटात काम करणारे कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण बालपणापासूनच नाट्यकलावंत असल्यांने, अभिनयाच्या क्षेत्रात आपली ओढ होती. अनेक नाटकात काम करतांना, झाडीपट्टीतील समृध्द अभिनयाला न्याय मिळत नसल्याची खंत होती, ही खंत भरून काढण्यांची मनात कल्पना होती, ती बेबसच्या निमीत्ताने काढता आली असे लांजे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात माहीती दिली.
बेबस हा सामाजीक हृदृयस्पर्शी चित्रपट आहे, कुटूंबासह पाहण्यासारखा आहे, येत्या 12 जानेवारीला विदर्भातील मूल, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, साकोलीसह अनेक चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. विदर्भात तयार होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यांची त्यांनी माहीती दिली. या चित्रपटाची शुटींग मूल शहरातील विविध भागासह तालुक्यात या चित्रपटाची शुटींग झाली. विदर्भातीलच 150 कलावंत या चित्रपटात असून, बेबसमध्ये 4 गाणी सुध्दा चित्रीत केल्यांचे त्यांनी कृपाल लांजे यांनी सांगीतले.
चित्रपटाला केंद्रिय सेंसार बोर्डाची परवाणगी मिळविण्यासाठीचे अनुभव विलक्षण असल्यांचे त्यांनी सांगीतले तर चंद्रपूर—​गडचिरोली जिल्हयातील कलावंत एवढा दर्जेदार सिनेमा बनवित असल्यांने सेंसार बोर्डाचे सदस्यांनी स्टॅंडीग आॉवेशन देत आमचा उत्साह वाढविल्यांचे त्यांनी यावेळी सांगीतले.
चित्रपटाचे शो चे बुकींग सुरू असून, नागरीकांनी आपल्या मातीतील कलावंतानी साकार केलेली कला पाहण्यासाठी चित्रपट आवर्जुन पहावा असे आवाहन बेबसच्या कलावंतानी केले.
पत्रकार परिषदेला बेबस चित्रपटात काम करणारे आशुतोष सादमवार, प्रभाकर भोयर, विनोद बोलिवार मिष्टी बोलिवार, अनिरुद्र सादमवार, सचिन गेडाम, नीलेश जंपलवार, प्रफुल येलचलवार, अंकिता चर्लावार, कुमुदिनी भोयर, उपस्थित होते.
कुठे पहाल बेबस?
जयश्री टॉकीज नागपूर, राजकला टॉकीज चंद्रपूर, प्रभात टॉकीज गोंदिया, महावीर टॉकीज साकोली, स्नेहल टॉकीज तिरोडा, गोल्ड सिने मॅक्स टॉकीज ब्रम्हपुरी, सत्यम टॉकीज गडचिरोली, मा.सा. कन्नमवार हॉल मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]