शेगाव पोलीस स्टेशन येथे ठाकरे स.पो.नि.यांनी सांभाळला पदभार...



अवैद्य रेती उत्खनन, वाहतूक, गौण खनिज उत्खनन, सट्टापट्टी, अवैध दारू विक्री यांच्यावर अंकुश लावण्याचे आव्हान...

 वरोरा/शेगाव... जगदीश पेंदाम

वरोरा तालुक्यातील मोठे पोलीस स्टेशन म्हणुन ओळखले जाणारे शेगाव पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी बुधवारी  पदभार सांभाळला असून जवळपास 102 गावाची धुरा त्यांच्यावर आलेली आहे..
स.पो.नी. ठाकरे हे मूळ तुमसरचे असून आतापर्यंत त्यांनी अचलपूर, अंजनगाव,यवतमाळ, अकोला,बल्लारशा सायबर गुन्हे शाखेत कार्यभार सांभाळला असून त्यांच्याकडे शेगाव पोलीस स्टेशन स.पो. नि.म्हणून आलेली जबाबदारी ही आव्हात्मक असली तरी सुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्य अधिकाऱ्याच्या योग्य वापर केला तर त्यांच्याकडून सर्वसामान्य ग्रामीण जनतेला निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे..
शेगाव परिसरात अवैध्य रेती उत्खनन, वाहतूक, गौण खनिज उत्खनन, सट्टापट्टी, अवैद्य दारू विक्री,यावर अंकुश लावण्याचे आव्हान ते कशाप्रकारे स्वीकारतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]