रब्बी हंगामातील सोयाबीन पिके बहरली...

रब्बी हंगामातील सोयाबीन पिके बहरली..
.

वरोरा/शेगाव....जगदीश पेंदाम

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिके लागवड केली त्यामध्ये धान,सोयाबीन, तूर,कपास पिकांची लागवड केली,परंतु हंगामात आलेल्या यलो मोझँक,करपा, रोगाने तसेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांची धान,सोयाबीन पीक नष्ट केली, त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील सोयाबीन, चना, गहु,हळद पिके लागवड केली आहे..
पावसाळ्या दिवसांमध्ये खरीप हंगामाला सुरुवात होते त्यामध्ये धान,सोयाबीन,कपास,तुर पिके जास्त प्रमाणात घेत असून रब्बी हंगामातील सुद्धा मोठ्या प्रमाणात     चना,लाख,लाखोरी,मुंग,सोयाबीनघेत असतात शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड झालेली दिसून येत आहे,तसेच चना ,मूग डाळ, सोयाबीन, हळद, उडीद,लाकोरी, लागवड केली असून या पिकांना पाण्याची प्रमाण कमी लागते यामध्ये सोयाबीन पिके विशेष करून कमी शेतकऱ्यांनी घेतली असून पिके सगळीकडे हिरवीगार पाहायला मिळत आहे
शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे साधन असून यामध्ये चारगाव धरण,निमडला तलाव, इरई नाला,चंदई नाला, शेतातील तलाव बोडी, पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध असून मोटार पंप, विहिरीचा साधन आहे.पिके घेताना शेतकऱ्यांना औषधी फवारणीच्या खर्च जास्त येत असून धान,तुर सोयाबीन, कपास,चना, पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असून सध्याच्या रब्बी हंगामाच्या परिस्थितीमध्ये गहू, चना, सोयाबीन आदी पिके बहरली असून खरीप हंगामात झालेली नुकसान रब्बी हंगामामध्ये थोडंफार भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून होत आहे निसर्गाच्या लहरीपणाचा दगा पुन्हा शेतकरी वर्गाला कापणीच्या वेळी बसणार की काय याकडे सुद्धा शेतकऱ्यांचे लक्ष लागलेली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]