अनोळखी युवकाचे शेगाव शेत तलावात आढळले प्रेत..




वरोरा.. जगदीश पेंदाम

येथून जवळच असलेल्या शेगाव बू येथे अनोळखी युवकाचे प्रेत आढळल्याने गावात तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.. 

सविस्तर असे की शेगाव बू. ते वाघोली रस्त्यावर असलेल्या शेत तलावात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेत तलावात एका इसमाचे प्रेत तरंगताना दिसले असता संबंधित घटनेची माहिती पसरताच शेत शिवारातील शेतकऱ्याने पाहण्यास गर्दी केली होती दरम्यान हे मृतदेह अनोळखी असल्याने या मृतदेहाची ओळख पटणे कठीण झाले होते तेव्हा याची माहिती शेगाव येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांना दिली असता तात्काळ घटना स्थळ गाठून मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले व अखेर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथे हलविण्यात आले परंतु या मृत्तदेहाची अजूनही ओडख पटली नसल्याने पोलीस अधिकारी तपासणी करून माहिती घेत आहेत सदर या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली psi महादेव सरोदे , भीमराव पडोळे, नितीन कुरेकार अन्य पोलीस तपास करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]