निलेश माथनकर "राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार" ने सन्मानित

नवभारत विद्यालय मुल येथील शिक्षक निलेश माथनकर "राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार" ने  सन्मानित


          आज दिनांक २६ जानेवारी २०२४ ला शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित नवभारत विद्यालय मुल येथे विद्यालयाचे शिक्षक निलेश माथनकर यांना भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा २०२३ , नवी मुंबई आयोजित "राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञा शोध उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२३ " शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री अशोकराव झाडे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
           सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाला अधिकाधिक ज्ञान आत्मसात करावे लागते. हे ज्ञान दाखविण्याचे, वाढविण्याचे आणि आपले अस्तित्व दाखविण्याचे  'स्पर्धा परीक्षा ' हे प्रभावी माध्यम आहे. देशात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा मध्ये शालेय विषय असलेल्या विषयावर आधारीत परीक्षा घेतल्या जातात. अशाच अनेक परीक्षांचे आयोजन विद्यालयात केले जाते त्याचे परीक्षा समन्वयक म्हणून काम पाहतात. त्यात राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षा, एकलव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, ग्रामगिता जीवन विकास परीक्षा,अल्पसंख्याक शिष्यवृत्ती चे नोडल अधिकारी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक राखीव शिष्यवृत्ती, राष्ट्रीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती,५ वी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात.
         विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोकराव झाडे सर यांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]