बाळकृष्ण गोरडवार यांचा अनोखा उपक्रम - गणराज्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची मोफत कटिंग

बाळकृष्ण गोरडवार यांचा अनोखा उपक्रम - गणराज्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची मोफत कटिंग
सावली - बोथली येथील सलून दुकानदार बाळकृष्ण गोरडवार यांनी गावातील शाळकरी मुलांचे मोफत कटिंग करीत वेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       तालुक्यातील बोथली येथे बाळकृष्ण गोरडवार यांचे सलून चे दुकान आहे. भारतीय राज्यघटनेने कोणताही व्यवसाय कुणीही करू शकतो हा अधिकार दिला त्यामुळे त्यांनी कटिंग, दाढी, हेअर कलर चे काम सुरु केले. सलून च्या कलेत ते निपुण झाले. गणराज्य दिनी आपणही काही देशाच्या कार्यात मदत करावी या हेतूने वर्ग 1 ते 12 च्या विद्यार्थ्यांची मोफत कटिंग करून मिळणार असे आवाहन केले. त्यानुसार दिनांक 25 जानेवारी ला 46 विद्यार्थ्यांची मोफत कटिंग करून दिले. त्यामुळे या उपक्रमाचे गावात कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]