धिरज धोडरे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेकडून सन्मानीत

धिरज धोडरे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेकडून सन्मानीतमूल येथील नवभारत कन्या विद्यालयाचे शिक्षक तसेच मतदार नोंदणीकरीता मूल तहसिल कार्यालयाने नेमलेले बिएलओ धिरज धोडरे यांनी मतदार नोंदणीचे कार्यात सर्वोत्कृष्ट कार्य केल्यांने जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते आज त्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रिय मतदान दिनाचे निमीत्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मतदार नोंदणीत जिल्हयातील सर्वोत्कृष्ट कार्य करणार्या बिएलओचा सत्कार करण्यात आला.  त्यात मूल तालुक्यातून मतदार नोंदणीचे कार्य सर्वोत्कृष्ट केल्याबद्दल श्री. धोडरे यांचा सत्कार जिल्हाधिकारी गौडा यांनी केला.

श्री. धोडरे यांनी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसिलदार डॉ. रविंद्र होळी, नायब तहसिलदार यशवंत पवार, निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शनात काम केले.  धोडरे यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]