सावलीत आशा गटप्रवर्तकांचे आंदोलन - घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी

सावलीत आशा गटप्रवर्तकांचे आंदोलन - घोषणेची अंमलबजावणी करण्याची सावली
सावली - आशा वर्करांना मागील संपकाळात आश्वासन देत मानधन वाढीची घोषणा केलेले असताना अंमलबजावणी करीत नसल्याने सरकारच्या विरोधात सी.आय.टी.यु संलग्नीत आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सावलीत आंदोलन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने शासनाला निवेदन दिले.
      राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा व गटप्रवर्तक काम करतात. मात्र त्यांना कामाचा मोबदला योग्य प्रमाणात देत नसल्याने अनेकदा आंदोलने झाली. त्यानंतर शासनाने आशा वर्करना 7000 व गटप्रवर्कांना 10000 वाढीव मानधन देण्याची घोषणा केली मात्र अजूनपर्यंत या घोषणेची आंमलबजावणी करीत नसल्याने सी.आय.टी.यु. संलग्नीत आशा व गटप्रवर्तक संघटनेकडून 1 जानेवारीपासून ऑनलाईन कामावर बहिष्कार व 14 जानेवारीपासून कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आज सावली तहसील कार्यालयासमोर कोरोना काळातील थकित 22 महिण्यांचा कोरोना भत्ता ताबडतोब आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्या खातात जमा करण्यात यावा,  जाहिर करण्यात आलेला दोन हजार दिवाळी बोनस आशाच्या व गटप्रवर्तक यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, संप काळातील कपात करण्यात आशा व गटप्रवर्तकांचे मानधन देण्यात यावे या मागण्या घेऊन  आंदोलन करण्यात आले. आंदोलनात  उषा चेनुरकर, सायली बावणे, अर्चना गिरसावरे, सुलभा पाटील, अरुण भेळके, प्रमोद गोळघाटे आदी पदाधिकारी सहभागी होते. माजी सभापती विजय कोरेवार यांनी मार्गदर्शन केले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]