तळोधी (बा.) वन परीक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू.


हृदयघाताने मृत्यू झाल्याची शक्यता झाडावर पस्तीस फूट उंचीवर मेलेला आढळला.
यश कायरकर:
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात तील तळोधी नीयतक्षेत्रात आज एका बिबट्या चा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. 
सविस्तर वृत्त याप्रमाणे की तळोदी बाळापुर चे वन कर्मचारी हे सकाळी कॅमेरा ट्रॅप चे फोटो चेक करायला गेले असताना परिसरात दुर्गंध आल्यामुळे त्यांनी परिसराची छान बिन केली असता तळोधी - गांगलवाडी रोड च्या लगतच महसूल विभागाचा गट क्रमांक 64 मध्ये एका 40 ते 45 फूट उंचीच्या बेहड्याच्या झाडावर 35 फूट उंचीवर एका फांदीवर बिबट मेलेला असल्याचे निदर्शनास आले. संबंधित घटनेची माहिती तात्काळ तळोधी बाळापुर चे वनपरिक्षेत्र  अधिकारी आरुप कन्नमवार यांना देण्यात आली घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून त्या बिबट्याला खाली उतरवून चौकशी केली असता सदर मृत बिबट ही साडेतीन ते चार वर्षे वयाचा मादा बिबट असल्याचे लक्षात आले. व घटनास्थळावरून हे बिबटमृत झाल्याची घटनाही पाच ते सहा दिवसापूर्वी घडल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीनुसार लक्षात आले. सदर परिसराची चौकशी केली असता ज्या झाडावर हा बिबट मेलेला होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याचे, मार्किंग केल्याचे व झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले. त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाईघाईने चढला व चढल्यानंतर हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.


        मोक्का पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागाच्या ऑफिसला पाठविण्यात आले. 
    विशेष म्हणजे तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत सतत वन्यजीव जखमी झाल्याच्या किंवा कोणत्याही वन्यजीव , वानर जखमी होणे असे निगडित घटना घडत असतात मात्र तळोधी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वन विभागाला मोठा त्रास सहन करावा लागते. आज या बिबटाच्या विच्छेदनासाठी तळोधी, नवरगाव , नागभीड या तिन्ही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे शिंदेवाहीच्या डॉक्टर यांच्याशी संपर्क केला असता त्या आजारी असल्यामुळे उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र नंतर चिमूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टरांना विचारणा करण्यात आली मात्र तेथील डॉक्टर राऊत यांनी मला ते जमणार नाही, मी येऊ शकत नाही असे म्हणून येण्यास टाळाटाळ केली. शेवटी कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचे शव हे वन विभागाच्या गाडीने ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदन करीता नेण्यात आले त्यामुळे या परिसरात नेहमी करिता डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे याकडे शासनाने लक्ष देणे ही अत्यंत गरजेचे आहे.


        झाडावरून बिबट्याचे शव उतरवणे,  मोक्का पंचनामा यावेळेस सहाय्यक वनसंरक्षक ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी एस बी हजारे, स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, संस्थेचे सदस्य सर्पमित्र जीवेश सयाम, झेप संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, मानद वन्यजीव रक्षक ब्रह्मपुरी विवेक करंबेकर, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, तळोधी क्षेत्र सहाय्यक अरविंद मने , नेरीचे क्षेत्र सहाय्यक चंद्रशेखर रासेकर वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवार,  वन मजूर, व स्वाब संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]