प्रजासत्ताक दिनी चीखलगावात प्रेमीयुगुल विवाहबद्ध 
सावरगाव वार्ताहर :   - 
                                नागभीड तालुक्यातील चिखलगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्थानिक तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी  यांच्या माध्यमातून प्रेमी युगुलाचा विवाह लावून देण्यात आला. 
                   चिखलगाव येथील पटवारू अशोक वरखेड (वय 24 )व मुलगी नागभीड  तालुक्यातीलच जीवनापुर  येथील प्रणाली विठ्ठल आत्राम  (वय 19)यांचे एकमेकांवर प्रेम होते त्यामुळे त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून लग्न लावून देण्याची विनंती केली त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन   झेंडावंदन झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोघांचे गावकऱ्यांचे उपस्थितीत लग्न लाऊन देण्यात आले.
  पटवारू अशोक वरखेड रा. चिखलगाव वय.२४
वधु प्रनाली विठ्ठल आत्राम रा. जिवनापुर वय.१९ यांच लग्न पार पडले. यावेळी 
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हर्षद  रामटेके ,
सिंधुताई उइके सरपंच चिखलगाव, केदार मेश्राम उपसरपंच चिखलगाव, प्रफुल्ल खोब्रागडे पोलिस पाटील चिखलगाव, नानाजी खोब्रागडे  सामाजिक कार्यकर्ते  चिखलगाव, उमेश मेश्राम चिखलगाव, नितेश मेश्राम, कार्तिक गेडाम, विलास उइके, सुनील उइके व समस्त चिखलगाव ग्रामवासिय  यांची उपस्थिती होती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]