प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिना निमित्त ध्वजारोहण तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमडे )

पवनी : - प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिना निमित्त २६ जानेवारी २०२४ रोज शुक्रवारला सकाळी ०७:३० ला नगरपरिषद सक्सेना प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे राकेश बिसने , कमलाकर रायपूरकर , तसेच शालेय व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य व प्रमुख अतिथी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शाळेतील मुख्याध्यापक शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितित ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर जिभकाटे यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. त्यामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर वृक्षारोपण या विषयावर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षाबद्दल ची माहिती देऊन झाडे लावण्याचे कार्यक्रम सक्सेना प्राथमिक शाळा च्या मैदानात शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.तसेच २६ जानेवारी याच दिवशी इयत्ता २ री चा विध्यार्थी चि. मेघ राजूजी खडसे याचा जन्मदिवस सुद्धा शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]