! Bright And Future !!! G.E.M. CONVENT चे सांस्कृतिक कार्यक्रम

!!!   Bright And Future  !!!
                              G.E.M. CONVENT चे सांस्कृतिक कार्यक्रम
                           मीराश्री बहुउद्देशीय संस्था, वाढोणा द्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश मीडियम कॉन्वेंट सावरगांव आणि वाढोण्याचे संयुक्तपणे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सावरगाव येथे दिनांक 13.01.2024 रोजी घेण्यात आले.
           मीराश्री बहुउद्देशिय संस्था, वाढोणा द्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश मीडियम कॉन्वेंट चे सांस्कृतिक कलाविष्कार कार्यक्रमची प्रस्तुति करण्यात आली. कार्यक्रमाचे व पालक समिती अध्यक्ष श्री.राजूजी निकुरे, उद्घाटक श्री.मंगेश भोयर सर ठाणेदार पोलीस स्टेशन तळोधी (बा.),प्रमुख मार्गदर्शक श्री.संतोष दुर्वा सर प्रांत युवा आयाम प्रमुख वनवासी कल्याण आश्रम नागपूर, प्रमुख उपस्थिती श्री.उज्वल सोयाम सर एलआयसी अधिकारी नागपूर, श्री.आर्यन दुर्वे सर शासकीय कारागृह कारागृह मुद्रणालय नागपूर उपस्थित होते.
           श्री.कैलास बोरकर संस्थेचे संस्थापक सचिव यांनी संस्थेचे उद्देश व पुढील वाटचालीची माहिती दिली, उद्घाटक श्री.मंगेश भोयर सर यांनी संस्कारासोबत शिक्षणाची आवश्यकता पटवून दिले, प्रमुख मार्गदर्शक श्री.संतोष दुर्वा सर यांनी शिक्षण व संस्कारातून आदर्श नागरिक घडवता येते याविषयी मार्गदर्शन केले, त्यानंतर कॉन्वेंटचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. त्यात NURSERY, KG-I , KG 2 च्या विद्यार्थ्यांनी नवनवीन गाण्यावर नृत्य प्रदर्शित केले प्रदूषणावर आधारित थीम सादर केली, कविता,परिचय, प्रार्थना सादर करण्यात आले. एकल नृत्यांमध्ये शर्वरी शेंडे प्रथम क्रमांक, सामूहिक नृत्यांमध्ये सावरगाव येथील कॉन्वेंट च्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक देण्यात आले. कार्यक्रमाचे निरीक्षक श्री रामटेके सर, श्री.बारसागडे सर, सौ.बोदेले मॅडम, सूत्रसंचालन सौ.शैला बोरकर मॅडम व आभार प्रदर्शन सौ.करिष्मा पुस्तोडे यांनी केले. विशेष सहकार्य सौ. वैशाली बोरकर मॅडम, सावरगाव व वाढोणा येथील नागरिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]