गारपीटने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत नोंद करा... अभिजीत पावडे
 वरोरा... जगदीश पेंदाम

वरोरा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव खेळ्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तसेच याच सोबत जोरदार गारपीट झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतात असलेले चना हरभरा, गहू तुर, अश्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने वरोरा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यावर असलेले शासकीय निमशासकीय कर्ज कसे फोडायचे असा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांना पडला आहे. 
  तसेच अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या गहू चना पिकाचा पीक  विमा उतरविला असेल अश्या शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपनीतून विमा उतरविला त्या संबधित कार्यालयात आपली अवकाळी पावसाने तसेच गारपीट ने झालेल्या नुकसानीची नोंद 72 तासाच्या आत करून टोल फ्री क्रमांक यावर माहिती कळवावी तसेच दिलेल्या अप्स वर आपली सर्व माहिती द्यावी तसेच आपण दिलेल्या माहितीची खात्री करून घ्यावी जेणे करून झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल .अशी माहिती युवा शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजीत पावडे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. याच सोबत समधित विभागाला भेटून तसेच तलाठी कार्यालयात आपली माहिती द्यावी व वरोरा तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामे करावे व सर्व पीडित शेतकरी बांधवांना सरकसकट एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी  अभिजीत पावडे यांनी केली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]