आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने स्वराज्य सप्ताह तथा स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन ...वरोरा......जगदीश पेंदाम 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन वरोरा येथील वणी बायपास मार्गावरील साईमंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राजेंद्र जैन, माजी आमदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हा पक्ष निरीक्षक , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नितीन भटारकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,व  स्वागताध्यक्ष म्हणून विलास नेरकर विधानसभा अध्यक्ष वरोरा भद्रावती तथा चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती सदस्य हे राहणार आहे,प्रमुख पाहुणे म्हणून सौ रंजनाताई पारशिवे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती अर्चनाताई बुटले महिला जिल्हा कार्याध्यक्ष, राजू बोरकर तालुकाध्यक्ष भद्रावती, रवींद्र भोयर तालुकाध्यक्ष वरोरा ,चंद्रकांत कुंभारे शहराध्यक्ष वरोरा ,गीतेश सातपुते शहराध्यक्ष भद्रावती, सौ अर्चनाताई आरेकर महिला तालुकाध्यक्ष भद्रावती तसेच कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणून कु. दीक्षा गुरणुले शिवव्याख्याते पांढरकवडा जिल्हा यवतमाळ तसेच कुमारी रूपाली पवार झुडुप चित्रपट फेम मुंबई या उपस्थित राहणार आहे, आदिशक्ती निॠती ते सावित्रीबाई फुले पर्यंत अनेक महापराक्रमी स्ञियांनी ईतिहास घडविला, शेतीचा शोध लावून मानवी जीवनाला स्थिरता प्रदान केली शिवराज्याची निर्मिती करून जिजाऊ माॅ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी राजा म्हणून जगापुढे आदर्श निर्माण केला आजही प्रत्येक घरात जिजाऊ आहे परंतु तिला इतिहास घडविण्यासाठी संधी सातत्याने नाकारण्यात आली या स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळ्यातून सर्व प्रकारच्या अज्ञानाच्या शृंखला तोडून विकासाचा शाश्वत मार्ग निर्माण व्हावा या मातृसत्ताक स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे करण्यात आले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]