दैनंदिन रेती माफियांची चांदीच - चांदी

वन व महसूल तसेच पोलीस प्रशासनाचे काम थंड बस्त्यात

जनता तक्रार देऊन थकली

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये कुठेही वाळू घाट लिलाव झाले नसल्याने शासकीय काम असो वा घरकुल योजना असो अथवा खाजगी बांधकाम याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चोरीची वाळू सर्रासपणे खुलेआम विक्री केली जात आहे. परंतु याकडे वनविभाग असो अथवा महसूल विभाग तसेच पोलीस यांच्या चक्क नजरे समोरून हि वाहतूक करून विक्री होत असेल आणि यास अधिकारी मोठ्या प्रमाणावर चालना देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार करावी तरी कुठे ? व दाद मागावी तरी कुठे असा ? जनतेला पडला आहे. महसूल मंत्री यांनी या चिमूर तालुक्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भारत स्वतंत्र होण्याअगोदर चिमूर या गावास स्वातंत्र्य मिळाले अशी या गावाची ख्याती आहे.एकीकडे चिमूर जिल्ह्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे अवैध व्यवसायास चालना देऊन जिल्ह्याचा विरोध दर्शविला जात आहे. विविध शासकीय कार्यालयात अनेक पदे रिक्त असूनही अशा अवैध व्यवसायामुळे अधिकारी चिमूर तालुक्यात व शहरात येण्यासाठी घाबरत असल्याची नेहमीच चर्चा बघायला मिळत असते. म्हणून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]